मुंबई – सलग दोन पराभवानंतर टीम इंडिया (Team India) विजयाच्या मार्गावर परतली आहे. तिसऱ्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) मोठ्या फरकाने पराभव केल्यानंतर संघाने चांगले पुनरागमन केले. या सामन्यात अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, जे आधीच्या सामन्यात फ्लॉप ठरले होते, पण या सामन्यातही कर्णधार ऋषभ पंतच्या (Rishabh pant) खास मित्राची कामगिरी निराशाजनक होती.
ऋषभ पंत आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही टी-20 सामन्यांमध्ये एकाच संघासोबत मैदानात उतरला आहे. ते खेळाडूंना सतत संधी देत आहेत, मात्र स्टार अष्टपैलू अक्षर पटेलने (Axar Patel) सर्वाधिक निराश केले आहे. अक्षर पटेल आणि ऋषभ पंत आयपीएलमध्ये एकाच संघात खेळतात. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली अक्षर पटेलने अनेक सामने जिंकले आहेत, मात्र या मालिकेत अक्षर पटेलची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
तिसऱ्या सामन्यातही खराब फॉर्म कायम
अक्षर पटेलसाठी ही मालिका आतापर्यंत खूपच वाईट ठरली आहे. अक्षरने पहिल्या T20 मध्ये 4 षटकात 10 धावांच्या सरासरीने 40 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या T20 बद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, पण तो फक्त 10 धावाच करू शकला आणि एक ओव्हर टाकल्यानंतर त्याने 19 धावा दिल्या. त्याचवेळी, तिसर्या T20 सामन्यात अक्षर पटेलने 4 षटकात 28 धावा दिल्या आणि 1 बळी मिळवला, तो फलंदाजीत 5 धावांवर नाबाद राहिला.
भारतीय संघ 2-1 ने मागे
टीम इंडियाने तिसर्या टी20 मध्ये 48 धावांनी मोठा विजय नोंदवला असला तरी दक्षिण आफ्रिकेचा संघ मालिकेत 2-1 ने पुढे आहे. ही मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाला उर्वरित दोन टी-20 सामने जिंकावे लागतील. टीम इंडियाने भारतात कधीही टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेला हरवलेले नाही.