EPFO Update : ईपीएफओच्या नियमांत मोठा बदल! विविध सुविधांसह पैसे काढणे होईल आणखी सोयीस्कर

EPFO Update : ईपीएफओच्या नियमांत मोठा बदल करण्यात आला असून यामुळे पैसे काढणे सोपे होणार आहे. यामुळे ईपीएफओ सदस्यांना आणखी फायदा होईल. जाणून घेऊयात संपूर्ण माहिती.

ऑनलाइन बँक केवायसी पडताळणी : तुम्हाला तुमच्या बँक किंवा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधून थेट KYC माहिती तपासता येईल.

DSC द्वारे नियोक्ता पडताळणी : तुमची बँक खाते माहिती सत्यापित करण्यासाठी तुमचा नियोक्ता डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र वापरेल.

सीडेड आधार क्रमांकाची पडताळणी : UIDAI तुमच्या बँकेचा आधार क्रमांक प्रमाणित करेल. यामुळे ऑनलाईन क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया वेगवान होऊन नाकारलेल्या दाव्यांची संख्या कमी होईल, कारण ऑनलाइन क्लेम व्हेरिफिकेशन बँकेच्या पासबुक किंवा चेक लीफच्या इमेजशिवाय करण्यात येईल.

ईपीएफओने पात्रतेचे नियम

वैध बँक डेटा : समजा तुमची बँक माहिती यापूर्वी केवायसी किंवा इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्रमाणित केली गेल्यास तर तुम्हाला कोणतेही दस्तऐवज सबमिट करण्याची कसलीही गरज नाही.

हक्काची रक्कम : हे लक्षात घ्या की या सवलती एका विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी असणाऱ्या दाव्यांवर लागू होऊ शकतात.

EPF दाव्यासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक कागदपत्र म्हणजे सदस्याचे नाव, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड ठळकपणे दिसणारा मूळ, रद्द करण्यात आलेला चेक. तुमचा दावा निकाली काढण्यासाठी हे तुमच्या बँक खात्याची माहिती म्हणून काम करत असते.

हे लक्षात घ्या की EPF दाव्यांमधील बहुतेक नकार योग्य कागदपत्रांच्या अभावामुळे आहेत. त्यासाठी तुम्ही तुमच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रतिमा देऊ शकता, त्या पानाची एक प्रत पाठवा जी रीतसर प्रमाणित केलेली असावी. तसेच या बाजूला बँकेचा शिक्काही असावा.

असा करा ऑनलाइन दावा सबमिट

  • सर्वात अगोदर तुमची UAN क्रेडेन्शियल्स वापरून सदस्य इंटरफेसमध्ये लॉग इन करा.
  • आता त्याच्या UAN मध्ये सूचीबद्ध केवायसी आणि पात्रता योग्य आणि पूर्ण असल्याचे सत्यापित करा.
  • पुढे योग्य दावा निवडा.
  • ऑनलाइन दावा दाखल करण्यासाठी, UIDAI मध्ये नोंदणीकृत सेल नंबरवर प्राप्त झालेल्या OTP द्वारे सत्यापित करणे गरजेचे आहे.

पात्रता

तुमच्याकडे नोंदणीकृत सदस्य स्थिती आणि वैध युनिव्हर्सल अकाउंट नंबर असावा. तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि इतर KYC माहिती तुमच्या UAN खात्यामध्ये समाविष्ट आणि प्रमाणीकृत करणे गरजेचे आहे.

Leave a Comment