EPFO Rules Change: EPFO आपल्या सदस्यांना फायदा देण्यासाठी काही नियमांमध्ये बदल केले आहे. याच बरोबर EPFO वैद्यकीय, शिक्षण, गृहनिर्माण उद्देश, विवाह इत्यादींच्या ॲडव्हान्स दाव्यांसाठी ऑटो मोड सेटलमेंटची सुविधा देखील प्रदान करत आहे.
पीएफ खातेधारकांना या सुविधेचा लाभ मिळतो. 6 कोटींहून अधिक लोक याचा लाभ घेत आहेत. या सुविधेत कर्मचाऱ्यांना इमर्जन्सी निधी मिळतो.
पूर्वी ईपीएफओच्या या सुविधेवर दावा करण्यासाठी 15 ते 20 दिवस लागायचे. मात्र आता हे काम 3 दिवसांत होते. पूर्वी, ग्राहकांची पात्रता, दस्तऐवज, पीएफ खात्याची केवायसी स्थिती, खात्याचे तपशील इत्यादी तपासण्यात आल्याने अधिक वेळ लागत असे. मात्र ऑटोमॅटिक यंत्रणा ईपीएफओने सुरू केली आहे. जेणेकरून क्लेम सहज मिळू शकेल.
कोण दावा करू शकतो ते जाणून घ्या
इमर्जन्सी परिस्थितीत या निधीच्या क्लेम सेटलमेंटसाठी ऑटो मोड सुरू करण्यात आला आहे. त्याची सुरुवात एप्रिलमध्ये झाली. त्यामुळे आजारपणाच्या वेळीच पैसे काढता येतात. आता त्याची व्याप्तीही वाढली आहे. आजारपण, शिक्षण, लग्न आणि घर खरेदीसाठी तुम्ही ईपीएफमधून पैसे काढू शकता. त्याच वेळी, आई-वडील आजारी असल्यास किंवा बहिणीचे लग्न होत असल्यास, आपण ॲडव्हान्स पैसे काढू शकता.
किती पैसे काढता येतील
आता पीएफ खात्यातून एक लाख रुपयांपर्यंत ॲडव्हान्स रक्कम काढता येणार आहे. तर आधी ही मर्यादा 50 हजार रुपये होती. ऑटो सेटलमेंट मोड संगणकाद्वारे ॲडव्हान्स निधी काढता येतो. यासाठी कोणत्याही मंजुरीची आवश्यकता नाही आणि तीन दिवसात पैसे तुमच्या खात्यावर पाठवले जातील. यासाठी केवायसी, दाव्याच्या विनंतीसाठी पात्रता, बँक खात्याचे तपशील इत्यादी प्रदान करणे आवश्यक आहे.
पैसे काढण्याची प्रक्रिया
यासाठी सर्वप्रथम तुम्हाला EPFO पोर्टलवर जाऊन लॉगिन करावे लागेल. यानंतर तुम्हाला ऑनलाइन सेवेला भेट द्यावी लागेल आणि दावा पर्याय निवडावा लागेल. बँक खाते सत्यापित करणे आवश्यक आहे. आता Proceed for Online Claim वर क्लिक करा.
यानंतर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये फॉर्म-31 निवडावा लागेल. यानंतर पीएफ खाते निवडावे लागेल. आता तुम्हाला पैसे काढण्याचे कारण आणि तुम्हाला किती पैसे काढायचे आहेत याबद्दलचे सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील. यानंतर पासबुक आणि स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल.
यानंतर तुम्हाला संमती द्यावी लागेल आणि आधारशी पडताळणी करावी लागेल. दाव्यावर प्रक्रिया केल्यानंतर, तो मंजुरीसाठी नियोक्ताकडे जाईल. तुम्ही ऑनलाइन सेवेअंतर्गत दाव्याची स्थिती तपासू शकता.