Telangana Congress: पुन्हा राजकीय भूकंप? 6 आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, अनेक चर्चांना उधाण

Telangana Congress: तेलंगणामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसने भारत राष्ट्र समिती (BRS) ला मोठा धक्का दिला आहे. यामुळे राज्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

माहितीनुसार, बीआरएसचे सहा विधान परिषदेतील आमदारांनी बीआरएसला बाय बाय करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या आमदारांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवण रेड्डी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 

दांडे विटाल, भानुप्रसाद राव, एमएस प्रभाकर, बोग्गापरु दयानंद आणि एग्गे मल्लेशम या आमदारांनी काँगेसमध्ये प्रवेश केला आहे.

तेलंगणाच्या AICC प्रभारी दीपा मुन्शी आणि राज्यमंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी हे देखील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते.

या वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर, बीआरएसच्या आमदारांसह अनेक नेते सत्ताधारी काँग्रेसमध्ये सामील झाले आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला होता. 

28 जून रोजी भारत राष्ट्र समितीचे शेवेल्ला येथील आमदार काळे यादैया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दिल्लीत मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि एआयसीसी प्रभारी दीपदास मुन्शी यांच्या उपस्थितीत यादव यांनी पक्षात प्रवेश केला.

तर जगतियाल येथील बीआरएस आमदार संजय कुमार यांनीही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. बीआरएस नेते कडियाम श्रीहरी, दानम नागेंद्र, तेलम वेंकट राव आणि पोचाराम श्रीनिवास रेड्डी यांनीही यापूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Leave a Comment