ENG Vs SA 2024: दक्षिण आफ्रिकेकडून पराभव, तरीही इंग्लंड उपांत्य फेरीत पोहोचणार? जाणुन घ्या समीकरण

ENG Vs SA 2024: T20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 मध्ये काल झालेल्या रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा सात धावांनी पराभव केला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 6 विकेट गमावत 163 धावा केल्या आणि त्यानंतर इंग्लंडला 20 षटकात 6 विकेट्सवर 156 धावांवर रोखले.

इंग्लंडकडून लियाम लिव्हिंगस्टन आणि हॅरी ब्रूक यांनी 76 धावांची भागीदारी  केली मात्र त्यानंतरही इंग्लंडला विजय मिळवता आला नाही. इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या तीन षटकांत 18 धावांची गरज होती, पण दक्षिण आफ्रिकेने लिव्हिंगस्टन आणि हॅरी ब्रूक यांना बाद करून पूर्ण सामना फिरवला.

पराभवानंतर इंग्लंड उपांत्य फेरीत कसे पोहोचेल?

दक्षिण आफ्रिकेचा सुपर-8 मधील दोन सामन्यातील हा सलग दुसरा विजय आहे. संघ आता चार गुणांसह गट-2 मध्ये अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा  रन रेट देखील +0.625 आहे. त्याचबरोबर इंग्लंडला दोन सामन्यांमध्ये पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. जोस बटलरच्या संघाच्या खात्यात दोन गुण आहेत आणि ते सध्या गट-2 मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. सुपर-8 मध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेशिवाय वेस्ट इंडिज आणि अमेरिका देखील आहेत. इंग्लंडला आता आपला शेवटचा सुपर-8 सामना अमेरिकेविरुद्ध खेळायचा आहे.

इंग्लंडने आपल्या पहिल्या सुपर 8 सामन्यात यजमान वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. अशा स्थितीत इंग्लंडला आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी अमेरिकेविरुद्ध कोणत्याही किंमतीवर विजय मिळवावा लागेल. इंग्लंडचा नेट रेटही चांगला असून अमेरिकेला हरवल्यास ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.  

पण अमेरिका आणि वेस्ट इंडिजचा विजय इंग्लंडसाठी अडचणी निर्माण करू शकतो. या विजयासह त्यांचे दोन गुण होतील आणि त्यानंतर दोघांना आणखी एक सामना खेळावा लागणार आहे. जर अमेरिका आणि वेस्ट इंडिजचेही चार गुण झाले तर दोन्ही संघांना त्यांचा नेट रेटवर निर्णय होऊ शकतो  कारण इंग्लंडचा नेट रनरेट खूप चांगला आहे. गट-1 आणि गट-2 मधील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

Leave a Comment