Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रोजगार संधी : CISF ने कॉन्स्टेबल पदांसाठी काढली बंपर भरती.. जाणून घ्या पात्रता नियम

मुंबई : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये बंपर भरती सुरू आहे. CISF कॉन्स्टेबल फायरमनच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. या भरतीसाठी तपशीलवार अधिसूचना अधिकृत वेबसाइट cisfrectt.in वर देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. CISF मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार अधिसूचनेतील सर्व तपशील तपासू शकतात. या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया २९ जानेवारी २०२२ पासून सुरू झाली आहे. तर ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 04 मार्च 2022 पर्यंत आहे.

Advertisement

या भरती मोहिमेद्वारे कॉन्स्टेबल फायरमनच्या एकूण 1149 जागा भरल्या जाणार आहेत. विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या फायर कॉन्स्टेबल भरती मोहिमेसाठी सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतात. तथापि, अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 23 वर्षे आहे.

Loading...
Advertisement

CISF फायर कॉन्स्टेबल भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड अंतिम मूल्यांकनाच्या आधारे केली जाईल. त्यानंतर लेखी चाचणी (CBT मोडमध्ये), वैद्यकीय चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST), आणि दस्तऐवज पडताळणी (DV) फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. ज्या उमेदवारांना CISF कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत दिलेली सर्व आवश्यक माहिती तपशीलवार तपासून पहा आणि विहित पात्रतेनुसार अर्ज करा.

Advertisement

निवडलेल्या उमेदवारांना वेतन स्तर-3 अंतर्गत रु. 21,700 ते रु. 69,100 मासिक पगारासह नियुक्त केले जाईल. या भरतीसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे. ज्यामध्ये राखीव उमेदवारांसाठी सूट देण्यात आली आहे. परीक्षा शुल्क नेट बँकिंगद्वारे, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आणि UPI वापरून किंवा SBI शाखांमध्ये रोख ठेवीवर SBI चलन तयार करून भरा. अधिक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचनेचा संदर्भ घेऊ शकतात.

Advertisement
Advertisement

Leave a Reply