Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगर येथील लष्कराच्या मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटमध्ये निघाली भरती.. असा करा अर्ज

अहमदनगर : भारतीय सैन्यात नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे. आर्मीच्या मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट, अहमदनगर यांनी गट क रिक्त जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असेल. या भरतीची जाहिरात 22 ते 28 जानेवारीच्या एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध झाली आहे.

Advertisement

या पदांवर केली जाईल भरती : गट क भरतीद्वारे निवडलेल्या उमेदवारांना भारतीय सैन्यदलाच्या मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट, अहमदनगरमध्ये कुक, वॉशरमन, सफाईवाला, बार्बर आणि LDC या पदांवर नियुक्ती दिली जाईल. उमेदवारांनी नोंद घ्यावी की या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत आहे. या आधी उमेदवारांनी अर्ज करावेत.

Loading...
Advertisement

भरती तपशील : पदाचे नाव रिक्त पद वेतन : कूक 11 पदे, वेतन 19000- रु. 63200/- दरमहा, वॉशरमन 3 पदे, वेतन 18000- 56900/- दरमहा, सफाईवाला 13 पदे, वेतन 18000- रु 56900/- दरमहा, नाई 7 पदे,  वेतन 18000- 56900/- दरमहा, LDC मुख्यालय 7 पदे, वेतन  19900- 63200/- दरमहा,  LDC MIR 4 पदे, वेतन 19900- रु 63200/- दरमहा.

Advertisement

निवड प्रक्रिया आणि वयोमर्यादा : अर्जदारांची निवड लेखी आणि प्रात्यक्षिक चाचणीच्या आधारे भारतीय लष्कराच्या मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट, अहमदनगरमध्ये गट C भरतीसाठी केली जाईल. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांना संबंधित श्रेणीनुसार वयोमर्यादा आहे. सामान्य आणि EWS श्रेणीसाठी वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे. OBC प्रवर्गासाठी वयोमर्यादा – 18 ते 28 वर्षे. SC आणि ST प्रवर्गासाठी वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
अर्ज कसा करावा : या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर, कागदपत्रे संलग्न करा आणि ADM शाखा (नागरी विभाग), मुख्यालय, MIRC, दरेवाडी, सोलापूर रोड, अहमदनगर-414110, महाराष्ट्र येथे पाठवा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply