Employment News: मुंबई : एकीकडे देशाच्या विकासाची आकडेवारी केंद्र सरकार सांगत आहे. तसेच त्यावर प्रश्न केल्यावर थेट देशविरोधी ठरवत आहे. अशावेळी आता आणखी एक आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. ज्यात देशातील युवकांना मोदीझटका सहन करावा लागला आहे. कारण, देशातील बेरोजगारीचा दर डिसेंबर 2022 या महिन्या मध्ये तब्बल 8.30 टक्के इतका वाढला आहे. 16 महिन्यांतील हा सर्वाधिक उच्चांक (Unemployment Hits 16 Month High) ठरला आहे. या विक्रमाने देशाची तरुणाई हतबल झाली आहे.
यापूर्वी ऑगस्टही 2021 मध्ये बेरोजगारीचा दर तब्बल 8.32% होता. तर, डिसेंबर 2021 मध्ये 7.91 टक्क्यावर आणि नोव्हेंबर-22 मध्ये 8% इतका होता. बेरोजगारीच्या प्रमाणात दिवसेंदिवस होणारी वाढ ही प्रामुख्याने देशातील शहरी भागातील बेरोजगारी वाढल्यामुळे झाली आहे. डिसेंबरमध्ये शहरी भागातील बेरोजगारीचे प्रमाण 10.09% वर पोहोचलेले आहे. तर, ग्रामीण भागातील बेरोजगारीचे प्रमाण किरकोळ घट होऊन 7.44% झालेले आहे. तर, रोजगाराचे प्रमाण डिसेंबरमध्ये 37.1% पर्यंत वाढले. जे जानेवारी 2022 नंतरचा सर्वाधिक उच्चांक राहीलेला असल्याचा दावा केला जात आहे.
महागाई आटोक्यात आणून लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे सरकार समोरील सर्वात मोठे आव्हान आता असणार आहे. सध्या प्रत्येक 1000 कामगारांपैकी 76 कामगारांना काम मिळाले नाही. CMIE ही संस्था दर महिन्याला 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करते आणि त्यांच्या रोजगाराच्या स्थितीची माहिती घेते. यानंतर, प्राप्त झालेल्या निकालांवरून एक अहवाल तयार केला जातो.
संस्थेच्या मते हा बेरोजगारीचा दर भारतीय अर्थव्यवस्थेचे आरोग्य अचूकपणे प्रतिबिंबित करतो. देशाच्या एकूण लोकसंख्येतील बेरोजगारांची संख्या हे सांगते. यंदा रब्बी पिकांच्या पेरणीत तेजी येईल. याचा अर्थ चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्र पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करेल. त्यामुळे स्थलांतरित मजूर शेतात परततील, असेही त्यांना वाटत आहे. देशाच्या आर्थिक आणि राजकीय धोरणतील चुकांमुळे अशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात बेरोजगारी वाढत असल्याचा दावा कॉँग्रेस आणि विरोधी पक्ष करत आहेत. उद्योग जगतामध्येही याबाबत चर्चा सुरू आहे. तर सत्ताधारी भाजपने उलट रोजगार वाढत असल्याचे दावे वेळोवेळी केले आहेत.