मुंबई : इलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेताच अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या. तर, काहींनी हा महत्वाकांक्षी श्रीमंत व्यक्ती अजिबात सकारात्मक नसल्याचा मुद्दा मांडला होता. मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेण्याच्या या घटनेचे नावेपण आता संपले आहे. आता त्यांच्या झटक्यांनी अनेकांची चिंता वाढवली आहे.
“मला नुकतेच काढून टाकण्यात आले आहे. पक्षी अॅप या संघाचा, या संस्कृतीचा भाग असणे ही सर्वात अभिमानाची बाब आहे.” असे ट्विटरवरून काढून टाकल्यानंतर भारताच्या यश अग्रवाल यांनी म्हटले आहे. अग्रवाल यांच्या या हृदयस्पर्शी हावभावाने युक्त ट्विटर पोस्ट सध्या शेअर होत आहे. मात्र, नोकरी गेल्याने सोशल मीडियावर अनेकांचा थरकाप उडाला. ट्विटरवरून कामावरून हटवल्या जाणाऱ्या सर्वच लोकांच्या प्रतिक्रिया एकसारख्या नाहीत. ट्विटरचे बहुतांश कर्मचारी सध्या खूप तणावाखाली आहेत. विशेषत: भारतातील परिस्थिती तर खूपच वाईट आहे. कारण मीडिया रिपोर्ट्सनुसार जवळपास संपूर्ण भारतातील जास्त कामगार काढून टाकण्यात आला आहे. तसेच या तणावाचे एक मोठे कारण हे देखील आहे की कंपनीच्या बाजूने कोणतीही स्पष्ट माहिती नाही. सध्या खूप गोंधळ आहे.
Just got laid off.
Bird App, it was an absolute honour, the greatest privilege ever to be a part of this team, this culture 🫡💙#LoveWhereYouWorked #LoveTwitter pic.twitter.com/bVPQxtncIg— Yash Agarwal✨ (@yashagarwalm) November 4, 2022
इलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेताच टाळेबंदीचे संकेत दिले होते. मस्क किंवा कंपनीने अधिकृतपणे याबाबत घोषणा केली नाही की टाळेबंदी होईल आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर कामगार काढले जाईल. कंपनीने जगभरातील आपल्या 7500 कर्मचाऱ्यांपैकी निम्म्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी केली आहे. मिंटने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की भारताचा जवळजवळ संपूर्ण संघ सुपडा साफ झाला आहे. आता कंपनीचे फक्त 10 कर्मचारी भारतात उरले आहेत. क्युरेशन टीमला काढून टाकण्यात आले आहे. कम्युनिकेशन्स, ग्लोबल कंटेंट पार्टनरशिप, सेल्स आणि रेव्हेन्यू टीममधील निम्म्या लोकांना कामावरून काढून टाकण्यात आलेले आहे. एप्रिल 2021 मध्ये ट्विटरने भारतात अभियांत्रिकी आणि उत्पादन कामगार वाढवण्याची घोषणा केली होती. परंतु येथेही टाळेबंदी करण्यात आली आहे. बेंगळुरू व्यतिरिक्त गुरुग्राम आणि मुंबईत कंपनीची कार्यालये आहेत.
Mumbai News: रस्त्याच्या कामामुळे हा मुख्य रस्ता राहणार चार दिवस बंद; करा पर्यायी मार्गाचा वापर