Elon Musk : नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क आता ट्विटर या मायक्रो-ब्लॉगिंग साइटसाठी नवीन नेतृत्वाच्या शोधात आहेत. मस्क अशा नेतृत्वाच्या शोधात आहेत जे आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडू शकतील. मस्कला शक्य तितक्या लवकर ट्विटरच्या प्रणालीची पुनर्रचना करून टेस्ला कंपनीला वेळ द्यायचा आहे. कारण मस्कच्या व्यस्ततेमुळे टेस्लाच्या गुंतवणूकदारांची काळजी वाढली आहे. मस्क यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनी ताब्यात घेतल्यानंतर, मला शक्य तितक्या लवकर त्याची पुनर्रचना करायची आहे जेणेकरून मी माझ्या इतर संलग्न कंपन्यांनाही वेळ देऊ शकेन.
ट्विटरची कमान पूर्णपणे त्यांच्या हातात आल्यापासून इलॉन मस्क ट्विटरमध्ये बदल करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, मस्कने ईमेल पाठवून कठोर श्रमासाठी कर्मचाऱ्यांनी तयार राहिले पाहिजे असे सांगितले. याआधी मस्कने ट्विटरच्या जवळपास निम्म्या कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकले आहे.
तसेच, मस्कने ट्विटरवर एक नवीन वैशिष्ट्य जोडण्याची घोषणा केली. हे फीचर फर्म्सना त्यांच्याशी संबंधित सर्व ट्विटर अकाउंटची माहिती देईल. एका ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की, मायक्रोब्लॉगिंग साइट वापरणाऱ्या कंपन्यांसाठी ट्विटर लवकरच एक नवीन फीचर घेऊन येणार आहे. मस्कने सांगितले की, हे फीचर लवकरच ट्विटरवर जोडले जाईल.
इलॉन मस्क यांनी बुधवारी सांगितले की, त्यांना कोणत्याही कंपनीचे सीईओ बनायचे नाही. टेस्ला कडून त्याच्या वादग्रस्त 2018 प्रोत्साहन-आधारित वेतन पॅकेजच्या चौकशीचा एक भाग म्हणून वकिलांना उत्तर देताना त्यांनी टिप्पण्या केल्या. मस्क यांनी असेही सांगितले की त्यांनी ट्विटरवरील आपला वेळ कमी करणे अपेक्षित आहे, सध्या ट्विटरवरील व्यवस्था तात्पुरती आहे.
- हे वाचा : म्हणून Elon Musk यांनी विकत घेतले twitter; आणि दिला CEO यांनाही डच्चू
- एलोन मस्क भारतासाठी करणार ‘हे’ काम; भारतीयांनाही मिळेल मोठा फायदा; पहा, कसे ते