Elon Musk | ‘मस्क’ देणार खिशाला झटका! युजर्सना ‘त्यासाठी’ही द्यावे लागणार पैसे; पहा, प्लॅन काय?

Elon Musk New Decision for New Users : सोशल नेटवर्किंग साईट ‘एक्स’ने नवीन युजर्सना प्लॅटफॉर्मवरील (Elon Musk New Decision for New Users) लाईक्स आणि पोस्टसाठी पैसे द्यावे लागतील. ट्विटरवर बनावट खात्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता वापरकर्त्यांना पोस्ट लाईक करण्यासाठी देखील पैसे द्यावे लागणार आहेत. यामुळे इथून पुढे युजर्सना आता आर्थिक भुर्दंड ही सहन करावा लागणार आहे. एलन मस्कने स्वतः ही मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार आता एक्सवर युजर्सला लाईक आणि नवीन पोस्ट करण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील बनावट खात्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने मस्केने हा निर्णय घेतला आहे.

कंपनी हे धोरण आपल्या नवीन वापरकर्त्यांवर लादण्याचा विचार करत आहे. मात्र यासाठी किती शुल्क आकारले जाईल आणि हे धोरण कधीपासून लागू केले जाईल याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. एक्स न्यूजच्या मते कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पेमेंट पॉलिसीची चाचणी आणि अंमलबजावणी केली आहे. कंपनीने ही चाचणी फिलिपिन्समध्ये केली आहे. ज्यासाठी वार्षिक शुल्क एक डॉलर होते. याबाबत एलन मस्कने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित या निर्णयाची माहिती दिली आहे.

Boxer Vijender Singh Joins BJP : काँग्रेसला धक्का! निवडणुकीआधी’या’ खेळाडूच्या हाती भाजपाचा झेंडा

Elon Musk

मागील वर्षीच एलन मस्कने ट्विटर विकत घेतले होते. ट्विटर खरेदी केल्यापासून मस्कने यामध्ये अनेक बदल केले आहेत. आधी ट्विटरचे नाव बदलले आणि नंतर त्याचा लोगो बदलला. यावेळी मस्कचे संपूर्ण लक्ष पैसे कमवण्यावर आहे. ज्याची सुरुवात त्याने सशुल्क सेवा वापरून आणि पैशांसाठी ब्लूटीक विकून केली. यापूर्वी ही ब्लूटीक मोफत उपलब्ध होती पण आता त्यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. याआधी एक्सवर ब्लूटीकसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता मस्कने युजर्सना पोस्ट लाईक आणि त्यावर रिप्लायसाठी पैसे मोजावे लागणार असल्याचे म्हटले आहे.

पोस्टसाठी पैसे आकारल्यामुळे बॉट्स आणि बनावट खात्यांवरील पोस्ट कमी होतील असा विश्वास मस्कने व्यक्त केला. सोशल मीडियावर होणाऱ्या चुकीच्या पोस्ट थांबविण्यासाठी हा एक महत्त्वाचा मार्ग असल्याचे त्याने म्हटले आहे. त्यामुळे आता एक्स वरील नव्या युजर्स ना पोस्ट टाकण्यासाठी, एखाद्याच्या पोस्टला लाईक करणे, पोस्ट बुकमार्क करणे आणि एखाद्या पोस्टला रिप्लाय देण्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात.

Elon Musk

Facebook Update : अर्रर्रर्र,  Facebook-Instagram वापरण्यासाठी द्यावे लागणार पैसे, मेटाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Leave a Comment