Electricity Saving Tips : उन्हाळाच्या दिवसातही लाईट बिल येईल कमी, ‘या’ सोप्या पद्धतीचा करा वापर

Electricity Saving Tips : उन्हाळ्याच्या दिवसात अंगाची काहिली होत असताना आल्हाददायक एसी आपल्या विजेच्या बिलाचा आकडा वाढवेल की काय असे अनेकांना वाटते आणि यादरम्यान आपण एसीचा आनंद विसरून जातो. पण तुम्ही बिल नियंत्रित राखण्यासाठी काही टिप्स फॉलो करू शकता.

एसीची करा सर्व्हिस

उन्हाळा आला की सर्व घरांमध्ये एसी सुरू होतात. एसी कॉम्प्रेसर चालू होताच विजेचे मीटर खूप वेगाने चालू होतात. अशा वेळी एसी सर्व्हिसिंगशिवाय चालवू नका. समजा फिल्टर खराब असेल तर कंप्रेसर योग्यरित्या काम करणार नाही. सर्व्हिसिंग केल्यानंतर, फिल्टर साफ केला जाईल. तसेच दुरुस्त केले जाऊ शकते. बाजारात असे अनेक एसी उपलब्ध असून ज्यांचे तंत्रज्ञान प्रगत आहे.

इन्व्हर्टर एसी हा सर्वोत्तम पर्याय?

आजकाल, इन्व्हर्टर एसी ट्रेंडमध्ये असून तो वीज वापरासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे सांगितले जाते. इन्व्हर्टर एसीसाठी दावा केला जातो की ते एका तासात फक्त 0.91 युनिट वीज वापरतो. याशिवाय एसी सारखी विद्युत उपकरणे खरेदी करताना ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएन्सी (बीईई) मॉडेलकडे विशेष लक्ष द्यावे. या मॉडेलचा एसी वीज वापर कमी करतो.

सौर पॅनेल

सध्याच्या काळात सोलर पॅनलचा वापर वाढला आहे. केंद्र सरकारही याबाबत अनेक सुविधा देत असून सोलर पॅनल बसवून तुम्हाला वीज बिलाचा ताण दूर करता येईल. तुमच्या घरात विजेचा वापर जास्त असेल तर जास्त वॅटचा सोलर पॅनल लावा.

एलईडी बल्बचा करा वापर

घरातील विजेचा वापर कमी करण्यासाठी ट्यूब लाइट आणि एलईडी बल्बचा वापर करणे गरजेचे आहे. 5 वॅटचा एलईडी 20 ते 25 वॅटच्या CFL प्रमाणे काम करतो. तर त्याच वेळी, यामुळे विजेचा वापर खूप कमी होतो. ते थोडे महाग असले तरी ते दीर्घकाळ वापरता येते.

Leave a Comment