Electric Scooter Tips : तुम्हीही अशाप्रकारे चार्ज करताय इलेक्ट्रिक स्कूटर का? वेळीच सावध व्हा

Electric Scooter Tips : जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर वापरत असाल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला खूप मोठा तोटा होऊ शकतो. कसे ते जाणून घ्या.

मोबाईलप्रमाणे करू नका चार्ज

जर तुम्ही तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरला मोबाईलप्रमाणे सतत चार्ज करत असल्यास ते खूप धोकादायक ठरते. बॅटरी खराब होते. भविष्यात तुमचे खूप नुकसान होईल. त्यामुळे जर तुम्ही असे करत असाल तर आजपासूनच हे करणे बंद करा. इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करण्याचा योग्य मार्ग म्हणजे जेव्हा स्कूटरची बॅटरी 10-15% पर्यंत पोहोचते त्यावेळी ती चार्जिंगवर ठेवा.

हे लक्षात घ्या की स्कूटर कधीही 100% पर्यंत चार्ज करू नये. असे केले तर बॅटरीवर वाईट परिणाम होतो. स्कूटर चार्ज करण्यापूर्वी मॅन्युअल तपासा. स्कूटरमध्ये सामान्य आणि जलद चार्जिंगचा पर्याय असेल तर फक्त सामान्य गतीने चार्ज करण्याचा प्रयत्न करा, यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढू शकेल.

वेग ठेवा मर्यादित

तुम्हाला तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरमधून चांगली रेंज मिळवायची असल्यास तुम्ही ती ताशी 40-60 किलोमीटर वेगाने चालववी. असे केले तर रेंज कमी होणार नाही आणि स्कूटरने जास्त अंतर कापता येईल. ओव्हरस्पीडिंग ठेवा कारण असे केले तर त्यांची रेंज कमी होते. अनावश्यक शर्यत आणि हॉर्नचा वापर यामुळे बॅटरी जास्त लागते.

टायरमध्ये हवेचा दाब

इलेक्ट्रिक स्कूटरच्या दोन्ही टायरमध्ये हवेचा दाब ठेवणे गरजेचे आहे. उष्णता तीव्र होत असताना, आठवड्यातून दोनदा हवेचा दाब तपासा. टायर्सचे आयुष्य चांगले राहील. कमी-जास्त हवेचा स्कूटरच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम होतो. टायरसाठी सामान्य हवेऐवजी नायट्रोजन हवेचा वापर करणे फायदेशीर ठरेल.

सर्व्हिसिंग करा

इलेक्ट्रिक स्कूटरची वेळेवर सेवा गरजेची असून एकही सेवा चुकली तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. इलेक्ट्रिक स्कूटरमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यात स्थापित केलेली लिथियम-आयन बॅटरी. सर्व्हिस सेंटरमध्ये गेले तर तेथे बॅटरीचे आरोग्य तपासले जाते. यासोबतच स्कूटरमध्ये लावलेली मोटारही तपासली जाते. स्कूटरमधील बॅटरीचे आयुष्य 5 वर्षांपर्यंत आहे.

Leave a Comment