Electric Scooter Sale in September : भारतीय दुचाकी बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी (Electric Scooter Sale in September) सातत्याने वाढत आहे. सतत वाढत जाणाऱ्या इंधनाच्या किमती (Fuel Price) आणि त्यांच्या कमी ऑपरेटिंग खर्चामुळे लोक ई-स्कूटर खरेदी करण्यास प्राधान्य देतात. गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर 2023 मध्ये विक्रीच्या बाबतीत टॉप-5 इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्यांबद्दल सांगणार आहोत. आमच्या यादीमध्ये ओला इलेक्ट्रिक ते अँपिअर ग्रीव्हजचा समावेश आहे. त्यांच्या विक्रीवर एक नजर टाकू या.
Ola Electric
या यादीत ओला इलेक्ट्रिक पहिल्या क्रमांकावर आहे. या दुचाकी इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनीने सप्टेंबरमध्ये एकूण 18,635 युनिट्सची विक्री केली आहे. Ola भारतीय बाजारपेठेत Ola S1 AIR, S1 X आणि S1 Pro सारख्या इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करते.
TVS
या यादीतील पुढील कंपनी TVS मोटर कंपनी आहे. TVS ने सप्टेंबर 2023 मध्ये एकूण 15,512 युनिट्सची विक्री केली आहे. भारतीय बाजारपेठेत टीव्हीएसकडे सध्या त्याच्या इलेक्ट्रिक स्कूटर लाइनअपचा भाग म्हणून I-Qube आणि TVS X मॉडेल्स आहेत.
Ather Energy
एथर एनर्जीने सप्टेंबर महिन्यात एकूण 7,109 युनिट्सची विक्री केली आणि या यादीत तिसरे स्थान मिळविले. Ather Energy सध्या भारतीय बाजारपेठेत 45S आणि 450X इलेक्ट्रिक स्कूटर विकते.
Bajaj
या यादीतील चौथी कंपनी बजाज ऑटो आहे. या कंपनीने सप्टेंबर 2023 मध्ये एकूण 7,045 युनिट्सची विक्री केली आहे. Chetak EV ही बजाजच्या इलेक्ट्रिक लाइन-अपमधील एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 3kWh बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे आणि 90 किमीची दावा केलेली श्रेणी ऑफर करते.
अँपियर ग्रीव्हज
या यादीतील पाचवी अँपिअर ग्रीव्हज दुचाकी आहे. सप्टेंबर 2023 मध्ये या इलेक्ट्रिक दुचाकीच्या एकूण 3,605 युनिट्सची विक्री केली आहे.