Electric Cars : इलेक्ट्रिक कारबाबत करू नका ‘ही’ चूक, मोजावे लागतील लाखो रुपये; कसं ते जाणून घ्या

Electric Cars : बाजारात आता जवळपास सर्वच कार निर्मात्या कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार लाँच करू लागल्या आहेत. विशेष म्हणजे या कार्सना चांगली मागणी आहे. या कारमध्ये शानदार फीचर्स पाहायला मिळत आहेत. पण इलेक्ट्रिक कार खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला लाखो रुपये मोजावे लागतील.

घ्या बॅटरीची काळजी

इलेक्ट्रिक कारची बॅटरी कधीही पूर्णपणे डिस्चार्ज होऊ देऊ नका. ज्यावेळी बॅटरी सुमारे 20 टक्के राहते त्यावेळी नेहमी चार्ज करण्याचा प्रयत्न करावा. बॅटरीच्या सतत पूर्ण डिस्चार्जमुळे, बॅटरीचे आयुष्य वेगाने कमी होते. हे लक्षात ठेवा की कारची बॅटरी कधीही 80 टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज होऊ देऊ नका.

कोणत्या प्रकारच्या चार्जरने चार्ज करावी बॅटरी?

इलेक्ट्रिक कारसह चार्जर कंपन्या देत असतात. हा कमी क्षमतेचा चार्जर असल्याने कारची बॅटरी चार्ज होण्यासाठी जास्त वेळ लागतो. हे टाळण्यासाठी लोक फास्ट चार्जरने कार चार्ज करत असतात. पण बॅटरी फास्ट चार्जरद्वारे जास्त काळ चार्ज केली तर त्याचे खूप जास्त तोटे आहेत. म्हणून, गरज असेल तेव्हाच जलद चार्जर वापरण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळी जास्त गरज नसते, तेव्हा इलेक्ट्रिक कारची बॅटरी सामान्य चार्जरने चार्ज करावी.

दुरुस्तीसाठी येतो लाखो रुपये खर्च

सर्वात महत्त्वाचे म्हणजे इलेक्ट्रिक कार दीर्घकाळ निष्काळजीपणे चालवली तर कारच्या मोटर आणि बॅटरीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. असे झाले तर कारचे आयुर्मानही कमी होऊ लागते. एकदा बॅटरी किंवा मोटर खराब झाली की ती बदलण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात.

कारचा वेग ठेवा मर्यादित

इलेक्ट्रिक कार चालवताना एखाद्याने नेहमी लक्षात ठेवा की कार अचानक जास्त वेगाने चालवू नये. असे केले तर बॅटरी खूप वेगाने डिस्चार्ज होऊ लागते आणि जास्त वेळ कार चालवली तर कारच्या बॅटरीवर वाईट परिणाम होतो.

Leave a Comment