Electoral Bonds Row : भाजपला ‘या’ 10 जणांनी दिले भरघोस देणगी, नाव जाणून व्हाल थक्क

Electoral Bonds Row : सध्या देशात इलेक्टोरल बाँड्स चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणात सत्ताधारी भाजपवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यातच आता भाजपला सर्वात जास्त देणगी देणाऱ्या 10 देणगीदारांची नावे समोर आली आहे. देणगीदारांची नावे जाणून तुम्हाला ही धक्का बसेल.

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 12 एप्रिल 2019 ते 11 जानेवारी 2024 दरम्यान, लोकांनी एकूण 180.2 कोटी किमतीचे इलेक्टोरल बाँड्सखरेदी केले आहेत, त्यापैकी भाजपला 152.2 कोटी मिळाले आहेत.

टीएमसीला मिळाली मोठी देणगी

एकूण देणगीच्या हे प्रमाण 85.5 टक्के आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी ही आकडेवारी जाहीर केली. वैयक्तिक देणग्या मिळवणारा दुसरा सर्वात मोठा पक्ष तृणमूल काँग्रेस आहे, ज्याला सुमारे 16.2 कोटी रुपये मिळाले आहेत. एकूण देणगीच्या हे 9 टक्के आहे. भारत राष्ट्र समितीला 5 कोटी रुपयांच्या वैयक्तिक देणग्याही मिळाल्या आहेत.

सर्वात महाग इलेक्टोरल बाँड्स खरेदी करणारे लोक

आर्सेलर मित्तलचे चेअरपर्सन लक्ष्मी निवास मित्तल यांनी 35 कोटींचे बाँड्स खरेदी केले आहेत. हे बाँड भाजपला देण्यात आले आहेत.

लक्ष्मीदास वल्लभदास मर्चंट यांनी दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक देणगी दिली आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांनी भाजपला 25 कोटी रुपये दिले. ते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ग्रुपचे नियामक आहेत आणि 33 वर्षांपासून कंपनीची सेवा करत आहेत.

OnePlus 5G मिळत आहे फक्त 668 मध्ये, दमदार फीचर्ससह जाणून घ्या ‘ही’ अप्रतिम ऑफर

इंडिगोचे राहुल भाटिया यांनी TMC ला 16.2 कोटी आणि NCP ला 3.8 कोटी दान केले. इंडिगोने मे 2019 मध्ये भाजपला 31 कोटी आणि एप्रिल 2023 मध्ये काँग्रेसला 5 कोटी दान केले.

अजंता फार्माचे सीईओ राजेश मन्नालाल अग्रवाल यांनी एकूण 13 कोटींची देणगी दिली. त्यांनी भाजपला 5 कोटी आणि काँग्रेसला 3 कोटी रुपये दिले.

अजंता फार्माने स्वतंत्रपणे भाजपला 3 कोटी आणि काँग्रेसला 1 कोटी दिले.

बायोकॉनचे किरण मुझुमदार शॉ वैयक्तिक देणगीदारांच्या यादीत 12 व्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 6 कोटी रुपयांची देणगी दिली. त्यांनी भाजपला 4 कोटी रुपये आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि काँग्रेसला 1 कोटी रुपयांची देणगी दिली.

‘या’ भागात पावसाचा इशारा, होणार हिमवृष्टी; जाणून घ्या IMD अलर्ट

या लोकांनी सर्वाधिक देणगी दिली आहे

लक्ष्मी निवास मित्तल, लक्ष्मी दास वल्लभदास मर्चंट, केआर राजा जेटी, इंदर ठाकूरदास जयसिंघानी, राहुल जगन्नाथ जोशी आणि त्यांचा मुलगा हरमेश राहुल जोशी, राजू कुमार शर्मा, सौरभ गुप्ता आणि अनिता हेमंत शाह यांनी भाजपला देणगी दिली आहे.

Leave a Comment