Electoral bond scam | बाब्बो.. ‘हा’ तर जगातील सर्वात मोठा स्कॅम..! अर्थमंत्री पतीने केलाय मोदी सरकारवर गंभीर आरोप

Electoral bond scam आहे किंवा नाही यावर सध्या देशभरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. भाजपचे मतदार आणि सरकार भक्त मंडळींनी हा स्कॅम नसल्याचे पटवून देण्यासाठी व्हाटसअपवर हजारो मेसेज फिरवले आहेत. तर, केंद्रातील भाजप (BJP Government) सरकारचे विरोधक असलेला कॉँग्रेस (Congress on Electoral bond scam) यावर मापात तोलून मापून बोलताना दिसत आहे. तर, इतर विरोधक शांत असताना आम आदमी पार्टी जोरात आरोप करताना पाहायला मिळत आहे. अशावेळी आता अर्थमंत्री निर्मला सितरामन यांचे पती आणि सुप्रसिद्ध अर्थतज्ञ (distinguished economist and the husband of Union Finance Minister Nirmala Sitharaman) परकला प्रभाकर (Parakala Prabhakar) यांनी याप्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारवर (PM Narendra Modi Government) गंभीर आरोप केला आहे.

Electoral bond scam बद्दल प्रसिद्ध झाली आहे बातमी

ABP News Bureau यांनी प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटले आहे की, एका वृत्त वाहिनीसोबत बोलताना त्यांनी असा गंभीर आरोप केला आहे की, “हा तर जगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा स्कॅम आहे.” केरळ कॉँग्रेस टीमने त्यांच्या ट्विटर हँडलवर (Kerala Congress Twitter Handle) याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. एकूणच यामुळे आतापर्यंत भाजपची पाठराखण करणाऱ्या मंडळींना याचा मोठा झटका बसला आहे. भाजपला कमी आणि इतरांना जास्त बॉन्ड मिळाल्याचे सांगताना अनेक चुकीचे आणि अनाकलनीय असे दाखले आणि आकडेवारी अनेक हिन्दी भाषिक वृत्त वाहिन्यांनी शेअर केली आहे. अनेक भाजप नेत्यांनी याप्रकरणी चुकीचे आकडे सांगून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. अशावेळी सुप्रसिद्ध अर्थतज्ञ परकला प्रभाकर यांनी यावर भाष्य केल्याने भाजपची खऱ्या अर्थाने आता गोची झालेली आहे.

Electoral bond scam वर कॉँग्रेस, आप यांची जोरदार टीका

दरम्यान कॉँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi on Electoral bond scam) यांनीही याप्रकरणी मोदी सरकारवर आरोप करताना अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. मात्र, या सर्व बातम्या प्रसिद्ध होणार नाहीत याची काळजी घेऊन माध्यमांनी याप्रकरणी सरकारची पाठराखण केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आप पक्षाच्या कर्त्याकर्त्यांनी मात्र देशभरात याप्रकरणी आवाज उठवला आहे. एकूणच अशावेळी सुप्रसिद्ध अर्थतज्ञ परकला प्रभाकर यांनी मोदी सरकारवर आरोप करताना या प्रकरणाचा उल्लेख जगातील सर्वात मोठा स्कॅम असा केल्याने आता त्यांच्या बातम्या आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. आता यावर सत्ताधारी भाजपकडून कोणती अधिकृत प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, एकूणच सर्व प्रमुख राजकीय पक्ष यात लाभार्थी असल्याने अखेरीस या प्रकरणाचे सूप कसे वाजणार याकडेही जगाचे लक्ष लागलेले आहे.

Leave a Comment