Elections 2024 : भाजपाचा ‘माइंडगेम’ अन् नेत्यांचा सोशल मीडिया अपडेट; “मोदी का परिवार”चं कारण काय?

Elections 2024 : लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या (Lok Sabha Election 2024) आहेत. विरोधी पक्ष जोरदार तयारी (Elections 2024) करत आहेत. सत्ताधारी भाजप तर आधीपासूनच इलेक्शन मोडमध्ये आहे. काही करून निवडणुका जिंकायच्याच या उद्देशाने भाजपाच्या बूथ लेव्हलच्या कार्यकर्त्यापासून अगदी पंतप्रधान मोदींपर्यंत (PM Narendra Modi) सगळ्यांनाच कामाला सुरुवात केली आहे. निवडणुकीत डाव टाकण्यात भाजप माहीर आहे. आताही भाजपने एक नवीन कार्ड समोर आणले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह सर्वच भाजप नेत्यांना त्यांच्या ट्विटर (आताचे एक्स) अकाउंटवरील प्रोफाइलमधील माहिती अपडेट केली आहे. या नेत्यांनी त्यांच्या नावापुढे “मोदी का परिवार” असे वाक्य लिहीले आहे.

पंतप्रधान मोदी आज तेलंगाणा आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. तेलंगाणातील आदिलाबाद येथील एका सभेत मोदी म्हणाले की सगळा देशच माझा परिवार आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्या ट्विटर प्रोफाइलमध्ये नवीन शब्द जोडले आहेत. पीएम मोदींचं वक्तव्य आणि पक्षाच्या रणनीतीनुसार नेत्यांनी हा बदल केल्याचे दिसत आहे.

Lok Sabha Elections 2024 : भाजपाचे 195 उमेदवार फायनल, पहिली यादी जाहीर; PM मोदींना ‘या’ मतदारसंघातून तिकीट

Elections 2024

खरंतर याआधी बिहारची राजधानी पटना येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी मोदींना कुटंब नसल्याचे वक्तव्य केले होते. लालूंच्या या विधानालाच पंतप्रधान मोदी यांनी आदिलाबादच्या सभेत प्रत्युत्तर दिल्याचे सांगण्यात येत आहे. सगळा देशच माझे कुटुंब असल्याचे मोदी या सभेत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्या प्रोफाइलमध्ये बदल करत आपल्या नावासमोर मोदी का परिवार असे शब्द नव्याने लिहिले आहेत. भाजप नेत्यांच्या सोशल मीडियावर बदललेल्या या प्रोफाइलची देशाच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे.

Elections 2024

या सभेत मोदी पुढे म्हणाले, तसं पाहिलं तर 140 कोटी देशवासीच माझं कुटुंब आहे. देशातील प्रत्येक गरीब, युवक हाच माझा परिवार आहे. ज्यांचं कुणीच नाही ते सगळे मोदींचे आहेत आणि मोदीही त्यांचे आहेत. माझा भारत माझा परिवार. विरोधी आघाडी इंडियातील नेते सध्या चिडल्याचे दिसत आहे. मी यांच्या घराणेशाहीवर टीका केली तर हे लोक म्हणायले लागले की मोदींचं तर कुटुंब नाही. पण, माझ्या देशातील नागरिक मला चांगलं ओळखतात. मी काय करतो याची सगळी माहिती देशाकडे आहे, असे मोदी म्हणाले.

लोकसभा निवडणुका जवळ (Lok Sabha Election) येत असतानाच भाजप नेत्यांनी हा बदल केला आहे. आता या नव्या घोषणेसह मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजप करेल, असे तर्क राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. याआधी 2019 मध्येही अशाच पद्धतीने भाजप नेत्यांनी त्यांच्या प्रोफाइलमध्ये ‘मैं हूं चौकीदार’ असे शब्द लिहिले होते. Elections 2024

Leave a Comment