भाजप आमदार पाचपुतेंना मोठाच झटका..! काष्टी सोसायटीत भगवानराव पाचपुते गटाचे पानिपत
अहमदनगर : अवघ्या आशिया खंडात मोठी सोसायटी म्हणून लौकिक असलेल्या काष्टी गावाच्या सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत यंदा सत्तांतर झालेले आहे. सरकार महर्षी काष्टी सेवा संस्थेच्या निवडणुकी ज्येष्ठ नेते कैलासराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ महाराज सर्वपक्षीय परिवर्तन पॅनेलने सर्व १३ जागा जिंकून भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटाला धक्का दिला आहे.
माजी अध्यक्ष भगवानराव पाचपुते गटाचा धुव्वा उडवत ४१ वर्षांची सत्ता संपुष्टात आणून ऐतिहासिक विजय मिळवल्याने तालुक्यासह जिल्ह्यात अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सहकारात देशपातळीवर नंबर एकवर असणारी आदर्श संस्था म्हणजे सहकार महर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया २०२२-२०२७ पर्यंतसाठी निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली. निवडणुकीत ६७७ मतदारांपैकी एकूण ६७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर मतमोजणी पूर्ण होऊन यामध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष कैलासराव शिवराम पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांनी संस्थेत परिवर्तन करून इतिहास घडवला.
राकेश कैलास पाचपुते, सुभाष साहेबराव पाचपुते, लक्ष्मण ज्ञानदेव पाचपुते, शहाजी शिवाजी भोसले, सर्जेराव दत्तात्रय पाचपुते, विठ्ठलराव जगन्नाथ काकडे, बाळासाहेब संभुदेव पाचपुते, रोहिदास पंढरीनाथ सोनवणे, प्रा. सुनील काळूराम माने, अलका संजय नलगे, सुवर्णा मनोहर दांगट, दादासाहेब बाबुराव कोकाटे, काशिनाथ अप्पासाहेब काळे या उमेदवारांनी ३५ ते ७० मतांच्या फरकाने विजय मिळवत परिवर्तन घडवून आणले. निवडणुकीत ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते यांचा मुलगा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रताप पाचपुते, माजी अध्यक्ष भास्करराव जगताप, संचालक लक्ष्मीकांत राम पाचपुते व अदिकराव चव्हाण या प्रमुख उमेदवारांचा पराभव झाला. (election politics kashti society bjp mla baban pachapute ahmednagar shrigonda news)
Adani Power News: महाराष्ट्राला अदानी झटका..! पहा कशा पद्धतीने शॉक दिलाय कंपनीने सरकारलाच https://t.co/pkfIyDcCIS
Advertisement— Krushirang (@krushirang) April 23, 2022
Advertisement