Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

By Election Results Live: खामोश.. शॉटगन धडाडली..! होय, भाजप उमेदवारांचा केला ‘इतक्या’ मतांनी बुकना

Please wait..

कलकत्ता : आज होत असलेल्या लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष आहे. सर्वात महत्वाची लढत म्हणून सुप्रसिद्ध अभिनेता आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या लढतीकडे पहिले जात आहे. दुपारी चार वाजेपर्यंत पश्चिम बंगाल येथील आसनसोलमधून TMC उमेदवार शत्रुघ्न सिन्हा 3,00,543 मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंतच्या मतमोजणीत शत्रुघ्न सिन्हा यांना 6,52,586 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या अग्निमित्रा पाल यांना 3,52,043 मते मिळाली आहेत. याशिवाय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पार्थ मुखर्जी यांना 89 हजार मतदान मिळाले आहेत.

Advertisement
Loading...

चार राज्यांतील विधानसभेच्या चार आणि लोकसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल येत आहेत. आतापर्यंत आलेले ट्रेंड/निकाल पाहता प्रत्येक जागेवर भाजपची निराशाच झालेली दिसते. पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे (TMC) शत्रुघ्न सिन्हा बंपर विजयाच्या मार्गावर आहेत. भाजपचे अग्निमित्र पॉल मागे पडल्या आहेत. बिहारमधील बोचाहान मतदारसंघातही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. येथून आरजेडीचे अमर पासवान विजयी झाले आहेत. छत्तीसगडमधील खैरागड जागेवरही भाजप पिछाडीवर असून काँग्रेस आघाडीवर आहे. याशिवाय महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर मतदारसंघातूनही काँग्रेस आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमधील बालीगंगे जागेवर टीएमसीचे बाबुल सुप्रियो आघाडीवर आहेत. (By Election Results Live Asansol Khairagarh Bochaha Kolhapur Ballygunge Kolhapur North Ke Natije All Updates)

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply