दिल्ली : 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसने आता जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. दुसऱ्या राज्यातही अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी काँग्रेस नेत्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. पुढील वर्षात काही महत्वाच्या राज्यांत निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये दक्षिण भारतातील कर्नाटक राज्य आहे. त्यामुळे आता काँग्रेसने या राज्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
कर्नाटकमध्ये पुढील वर्षी (कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३) विधानसभा निवडणुका होणार आहेत. काँग्रेसने आतापासूनच मिशन कर्नाटकची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यासाठी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. याच अनुषंगाने राहुल गुरुवारी कर्नाटकात पोहोचणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी आपल्या दौऱ्यात अनेक सभा घेणार आहेत.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खडगे यांनी एजन्सीला सांगितले की, “राहुल गांधी अनेक वरिष्ठ नेत्यांची बैठक घेणार आहेत. काँग्रेसला मजबूत करण्यासाठी आगामी निवडणुकांबाबतही ते चर्चा करणार आहेत. राहुल गांधी ज्येष्ठ नेते, आघाडीची संघटना, पक्ष कार्यकारिणी यांची भेट घेणार असल्याची माहिती खडगे यांनी दिली. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयालाही ते भेट देणार आहेत. विशेष म्हणजे कर्नाटकमध्ये विधानसभेच्या 224 जागा आहेत. राज्यात सध्या भाजप सरकार आहे. भाजपकडे एकूण 121 आमदार आहेत. तर विरोधी पक्ष काँग्रेसकडे 69 आमदार आहेत. त्याचबरोबर जेडीएसकडे 32 आमदार आहेत.
दरम्यान, गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत सर्वच पक्षांनी तयारी जोरात सुरू केली आहे. 5 राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसने (Congress) या राज्याकडेही लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. 5 राज्यांतील पराभव विसरून पक्षाने आता गुजरातवर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळेच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गुजरात काँग्रेस नेत्यांची बैठक काही दिवसांपूर्वी घेतली होती. या बैठकीत भारतीय जनता पार्टीचा मुकाबला आणि आम आदमी पक्षाला (AAP) रोखण्यासाठी रणनिती तयार करण्यात आली.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत भाजपसोबत ‘आप’च्या विरोधात आक्रमक प्रचार करण्याचे मान्य करण्यात आले. सभापती आणि विधिमंडळ पक्षनेते यांची नुकतीच निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अशा परिस्थितीत आता काँग्रेस लवकरच संघटनेचा आणखी विस्तार करण्यावर आधिक लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. अनेक राज्यांमध्ये पक्षांतरामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत पक्षानेही मागील अनुभवांतून आता शहाणे होण्यास पक्षाने सुरुवात केली आहे.
वा.. रे.. सरकार..! म्हणे, ‘त्या’ महागाईसाठी रशिया आणि काँग्रेस जबाबदार; पहा, काय सुरू आहे राजकारण..
भाजप-काँग्रेसला जोरदार झटका..! ‘या’ राज्यातील निवडणुकीत दणदणीत पराभव; जाणून घ्या, अपडेट राजकारणाचे..