Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्यांनाच’ मिळणार आहे विधानसभेचा अध्यक्ष म्हणून संधी; पहा पटोले यांनी नेमके काय म्हटलेय

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. तसेच या मुद्द्यावर आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचे सांगितले आहे. त्यानंतपर आता काँग्रेसनेही भाष्य केले आहे. विधानसभेचा अध्यक्ष काँग्रेस पक्षाचाच होणार आहे. त्यावर महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस पक्ष आपल्या आमदारांची मते जाणून घेऊन श्रेष्ठींना कळवेल, आणि अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर होईल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Advertisement

विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीबाबतही त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. याआधीही त्यांनी राज्यपाल यांच्यावर टीका केली होती. राज्यपालांचे कार्यालय भाजप कार्यालय झाले आहे, असा आरोप त्यांनी केला होता. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात व्हावी अशी महाविकास आघाडीची इच्छा आहे. मात्र या मुद्यावर भाजप राज्यपालांना पुढे करून राजकारण करत आहे. मात्र, त्यांच्या राजकारणास आम्ही आजिबात भीक घालत नाही. आमदारांच्या कोरोना तपासण्या झाल्यांनातरच पुढील परिस्थिती स्पष्ट होईल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

Loading...
Advertisement

दरम्यान, याआधी मुख्यमंत्री ठाकरे यांनीही राज्यपाल कोश्यारी यांच्या पत्रास उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे, की अधिवेशनाचा कालावधी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरवण्यात आला आहे. यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया सुद्धा पूर्ण केली आहे. कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका आणि केंद्र सरकारने दिलेल्या सूचना विचारात घेऊन हा निर्णय घेतला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयाच्या निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे, असे त्यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी कोणताही कालावधी निश्चित केलेला नाही. त्यामुळे आतापर्यंत विधानसभा अध्यक्षांची निवड करता आलेली नाही. अध्यक्ष पदाची निवडणूक लवकरात लवकर घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply