Election Commission issued Notice to CM Office : राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. राजकीय (Election Commission) पक्षांकडून जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. आज महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेत जागावाटपाचा फॉर्मुला घोषित केला तर दुसरीकडे महायुतीतही जागावाटपाचे निर्णय घेतले जात आहेत. परंतु महायुतीत जागावाटपावरून धुसफूस जास्त प्रमाणात दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यामुळे नेतेमंडळी कमालीची नाराज झाली आहेत. या नाराज नेतेमंडळींबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी एक बैठक घेतली होती. परंतु आता ही बैठकच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यामागे कारणही तसेच घडले आहे.
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीसंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार (Election Commission) दाखल केली आहे. निवडणूक आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवांना नोटीस पाठवली आहे. याप्रकरणी उत्तर मिळाल्यानंतर त्यानुसार कारवाई केली जाईल असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
Election Commission
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी वर्षा या सरकारी निवासस्थानी शिवसेना नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीसंदर्भात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. आचारसंहितेचा भंग झाला म्हणून कारवाई करा अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली होती. यानंतर निवडणूक आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाला नोटीस बजावली आहे.
तसं पाहिलं तर महायुतीत जागावाटपावरून अनेक मतदारसंघात तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा सोडविण्यासाठी नेतेमंडळींना मोठी कसरत करावी लागत आहे. तर महायुतीतील सर्वात मोठा पक्ष भाजपकडून घटक पक्षांवर दबाव टाकला जात असल्याचाही चर्चा सुरू झाल्या आहेत. या दबावामुळेच विद्यमान खासदारांचे तिकीट कापले गेल्याची भावना निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या काही खासदारांचे तिकिटे कापण्यात आले आहे. त्यांच्या जागी दुसऱ्या उमेदवारांना संधी देण्यात आली. परंतु यामुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे. या अस्वस्थेतूनच शिंदे गटाच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती.
Election Commission
यावेळी एक छोटेखानी बैठक ही पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु ही बैठकच विरोधकांच्या निशाणावर आली आहे. आचारसंहितेच्या काळात सरकारी निवासस्थानी बैठक घेतली गेल्याने काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या बैठकीविरोधात तक्रार दाखल करत हा आचारसंहितेचा भंग असल्याचा दावा देखील सावंत यांनी केला होता. यानंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मुंबईचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव विशेष कार्यकारी अधिकारी यांना नोटीसा बजावल्या आहेत आता. या नोटीसीला त्यांना नक्कीच उत्तर द्यावे लागणार आहे.