Rahul Gandhi : मोदींवरील टीका भोवली! राहुल गांधींना निवडणूक आयोगाची तंबी; नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi : देशातील राजकीय पक्षांनी लोकसभा (Rahul Gandhi) निवडणुकांची तयारी (Lok Sabha Election) जोरात सुरू केली आहे. जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. विरोधी पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यातच आता काँग्रेससाठी (Congress Party) झटका देणारी बातमी आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका करताना विचारपूर्वक वक्तव्ये करावीत, असे निर्देश निवडणूक आयोगाने (Election Commission of India) दिले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत नेतेमंडळींना टीका करताना मर्यादेचे पालन कराव लागणार आहे.

Rahul Gandhi । बिग ब्रेकींग! राहुल गांधींना हायकोर्टाचा मोठा झटका, नेमकं कारण काय? जाणून घ्या

Rahul Gandhi

आयोगाने त्यांना भविष्यात अधिक सावध आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. मागील वर्षात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावर दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या 22 नोव्हेंबर रोजीच्या भाषणावर आक्षेप घेत त्यांना नोटीस धाडली होती. या नोटीसीचे उत्तर दोन महिन्यांत देण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांवर टीका करताना आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता.

त्यांच्या या वक्तव्यांवर कारवाई करत निवडणूक आयोगाने त्यांना अशी वक्तव्ये करण्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. याआधी 23 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती. राजस्थान विधानसभा निवडणुकी दरम्यान त्यांनी केलेल्या भाषणांबाबत स्पष्टीकरण मागितले होते. भाषणात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांचा पाकिटमार असा उल्लेख केला होता. पंतप्रधान लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवतात आणि थेट उद्योगपतींना फायदा करून देतात. पाकिटमार अशाच पद्धतीने कामे करतात असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

Rahul Gandhi

Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ ? ‘त्या’ प्रकरणात पोलिस बजावणार समन्स; जाणून घ्या सर्वकाही 

Rahul Gandhi

निवडणूक आयोगाचा इशारा काय?

आता लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने इशारा दिला होता की आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास पक्ष, उमेदवार आणि स्टार प्रचारकांना कारवाईला सामोरे जावे लागेल. उमेदवार आणि प्रचारकांना आयोगाने याआधीही नोटीसा बजावल्या आहेत. यानंतर आता निवडणुकीत नेतेमंडळी कशा पद्धतीने एकमेकांवर टीका टिप्पणी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment