Election Commission: राजकीय दृष्टीने दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक असणाऱ्या कर्नाटकामध्ये येणाऱ्या काही दिवसात विधानसभा 2023 निवडणुका होणार आहे.
सध्या या राज्यात भाजपाची सत्ता आहे मात्र आता विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार पुत्तण्णा यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
दक्षिणेचे गेट म्हटल्या जाणाऱ्या कर्नाटकात पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजप पूर्णपणे सक्रिय आहे. राज्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे वारंवार दौरे होत आहेत. दुसरीकडे काँग्रेसही सातत्याने निवडणुकीच्या तयारीत गुंतलेली आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे गृहराज्य असल्याने पक्ष येथे जोरदार प्रयत्न करत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला तळ ठोकून आहेत.
भाजप आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
भाजपचे एमएलसी पुत्तण्णा यांनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला, प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत भाजप एमएलसी पुत्तण्णा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
एक दिवस अगोदर शुक्रवारी पुत्तण्णा यांनी भाजप आमदार पदाचा राजीनामा दिला होता. यासोबतच त्यांनी भाजपचे प्राथमिक सदस्यत्वही सोडले होते. त्यानंतर त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
कर्नाटकात भाजपला मोठा धक्का
निवडणुकीपूर्वी कर्नाटकमध्ये भाजपला सतत पराभवाचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवड्यात भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांच्या मुलाला 40 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.
त्यानंतर BWSSB चे मुख्य लेखापाल प्रशांत मदल, भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांचा मुलगा आणि इतर ठिकाणांहून 8 कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले. या घटनेमुळे विरोधी पक्ष भाजपवर सतत हल्लाबोल करत आहे. सरकारवर 40 टक्के कमिशनच्या घोटाळ्याचा आरोप तीव्र झाला आहे.
कर्नाटकात मे 2023 पर्यंत निवडणुका होऊ शकतात
मे 2023 पर्यंत कर्नाटकात विधानसभा निवडणुका होऊ शकतात अशी माहिती आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे.
शुक्रवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि इतर अधिकारी कर्नाटकात पोहोचले आहेत. निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाचे अधिकारी सर्व राजकीय पक्ष आणि प्रशासनाच्या बैठका घेत आहेत. त्यानंतर येथे निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील.