Election Commission | काँग्रेसला धक्का! निवडणूक आयोगाकडून ‘या’ नेत्यावर प्रचार बंदी; कारण काय?

Election Commission bans Election Campaigning of Randeep Surjewala : ऐन लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणजीत सुरजेवाला यांच्या प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) रणदीप सूरजेवाला यांच्या निवडणूक प्रचारावर बंदी घातली. भारतीय जनता पक्षाच्या खासदार हेमामालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवाला यांनी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याबद्दल निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने सुरजेवाला यांच्या यांच्यावर प्रचार आणि कोणत्याही प्रकारची मीडिया मुलाखत देण्यास 48 तासांची बंदी घातली आहे. (Election Commission bans Election Campaigning of Randeep Surjewala)

सुरजेवाला यांनी खासदार हेमामालिनी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने रणदीप सुरजेवाला यांना नोटीस बजावून उत्तर मागितले होते. परंतु सुरजेवाला यांनी उत्तर देताना सांगितले होते की ज्या व्हिडिओबाबत तक्रार करण्यात आली आहे त्या व्हिडिओशी छेडछाड करण्यात आली आहे.

Congress Manifesto : काँग्रेसने जाहीर केला ‘न्याय पत्र’! मिळणार 25 लाखांचा आरोग्य विमा, जाणुन घ्या ‘या’ 10 महत्त्वाच्या गोष्टी

Election Commission

संदीप सुरजेवाला यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर निवडणूक आयोगाने पुढील कार्यवाही करत रणदीप सुरजेवाला यांच्यावर दोन दिवसांची निवडणूक प्रचार बंदी घातली आहे. आता या काळात रणदीप सुरजेवाला पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करू शकणार नाहीत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत काँग्रेस पक्षाला हा मोठा झटका बसला आहे.

रणदीप सुरजेवाला हे काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांमध्ये गणले जातात. काँग्रेस पक्षातील अनेक महत्त्वाची पदे त्यांनी सांभाळली आहेत. भाजपवर टीका करण्यात ते नेहमीच पुढे असतात. निवडणूक आयोगाच्या या कारवाईवर अद्याप काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. काँग्रेस नेते यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment