Eknath Shinde । ‘लाडकी बहीण योजने’नंतर आता ‘तो’ जीआरही काढा, मुख्यमंत्र्यांना लिहिलं महिलेने रक्ताने पत्र

Eknath Shinde । राज्य सरकारने नुकतीच खास महिलांसाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ ही योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत राज्य सरकारतर्फे 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले देण्यात येणार आहेत. या योजनेच्या लाभासाठी राज्यातील महिलांनी धडपड सुरु केली आहे.

अशातच आता सोलापुरातील बार्शी या ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चक्क रक्ताने पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये संबंधीत महिलेने महाराष्ट्रातील विद्यार्थिनींना मोफत शिक्षण देण्याच्या घोषणेचे काय झालं, असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, हे पात्र बार्शीमधील समाज परिवर्तन महासंघाच्या एका महिला पदाधिकाऱ्याने लिहिले आहे. काही महिन्यांपूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्रातील विद्यार्थिनींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली होती. पण त्याचा जीआर निघाला नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने याबाबत गंभीर दखल घेत लाडकी बहीण योजनेसोबतच मुलींच्या मोफत शिक्षणाचा जीआर काढावा, अशी मोठी मागणी या महिलने केली आहे. हे पत्र सध्या खूप व्हायरल होत आहे.

“पत्रास कारण की मी गेले सहा महिने समाज परिवर्तन महासंघ या संघटनेकडून सर्व जाती धर्माच्या मुला-मुलींना मोफत सर्व शाखेतील पदवी-पदविकेचे म्हणजेच डिप्लोमा-डिग्रीचे उच्च तंत्र शिक्षण मिळावे, म्हणून प्रयत्न करत असून या अनुषंगाने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी चंद्रकांत पाटील यांच्याकडून राज्यातील मुलींना डिप्लोमा-डिग्रीचे १ जून २०२४ पासून मोफत देण्याची घोषणा करण्यात आली होती. विशेष म्हणजे पुन्हा २० जूनच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी लवकरच मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली.

पण जुलै महिना सुरु झाला, पण सरकारकडून मोफत शिक्षणाचे परिपत्रक जीआर निघाला नाही. हा महाराष्ट्र सावित्री फुलेंचा, अहिल्याबाई होळकरांचा, जिजाऊंचा, फातिमा शेरव अशा कर्तबगार महिलांचा आहे. मुख्यमंत्री महोदय आपल्या डोळ्यासमोर आपले लेकरु मरत असेल, तर त्याच्या वेदना काय असतात हे दु्र्देवाने आपणास ठाऊक आहे. आपण लाडकी बहिण योजना आणली, आपले धन्यवाद. बहि‍णींच्या लेकराच्या शैक्षणिक भविष्यासाठी विचार करुन तातडीने मुलींच्या मोफत शिक्षणाचे परिपत्रक काढून लाडक्या बहि‍णींना राखीपोर्णिमेला आपल्याकडून खरी ओवाळणी असेल,” असे या महिला पदाधिकाऱ्याने पत्रात नमूद केले आहे.

Leave a Comment