Eknath Shinde : राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली (Eknath Shinde) आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढत होणार आहे. या दोन्ही आघाड्यांकडून उमेदवारांची नावे जाहीर केले जात आहेत तसेच कडाक्याच्या उन्हाळ्यात प्रचारानेही जोर धरला आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील प्रमुख चार नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट रचला होता, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे शिवसेना लोकसभेच्या 16 जागा लढवणार असल्याचे संकेतही यावेळी दिलेत.
एकनाथ शिंदे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा मोठा दावा केला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता होती असा दावा चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी देखील असाच दावा केला आहे. या मुलाखतीत एकनाथ शिंदे म्हणाले की देवेंद्र फडणवीसच नव्हे तर आशिष शेलार, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन या भाजप नेत्यांविरोधात खटले उभे करून त्यांना अटक करण्याचा कट रचण्यात आला होता. तसेच 2024 च्या निवडणुकीआधी भाजपचे आमदार फोडून त्यांना आपल्या गोटात घेण्याची रणनीती आखण्यात आली होती.
Sangli Lok Sabha | अर्र.. AB फॉर्म मिळाला नाही, माघार घेणार का?, विशाल पाटलांनी नेमकं काय ठरवलं?
Eknath Shinde
या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी राज्यात 16 जागा लढविणार असल्याचे संकेत दिले आहेत. महायुतीमध्ये अद्याप काही जागांवर तिढा निर्माण झाला आहे तर काही जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. आता अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांनी 16 जागा लढविणार असल्याचा दावा केल्याने महायुतीत अजूनही आलबेल नाही असे आले आहे. शिवसेना ज्या 16 जागा लढविल त्यात मुंबईतील तीन जागांचा समावेश असेल, आमच्यात जागावाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आतापर्यंत 11 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. आता शिंदे यांच्या या दाव्यावर विश्वास ठेवला तर आणखी पाच जागांवर शिंदे गट उमेदवार देईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाणे, पालघर आणि नाशिक या जागांवर उमेदवार देईल.
Eknath Shinde