Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी केले एमबीएमसीच्या सेंट्रल स्कूल कमांड सेंटरची शहरांमध्ये पुनरावृत्ती करण्याचे आवाहन

Eknath Shinde: मिरा-भाईंदर महानगरपालिका, जी मुंबई महानगर प्रदेशातील एक महत्त्वाची नागरी स्थानिक संस्था आहे. जी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी व कल्याणासाठी प्रबळ वचनबद्ध आहे. १२ लाख लोकसंख्येसाठी ३६६ शाळांचे व्यवस्थापन करणारी एमबीएमसी १,३७,००० विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सतर्क राहिली असून महाराष्ट्र शासनाने २४ ऑगस्ट २०२४ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने एमबीएमसीने विद्यार्थ्यांच्या फक्त सुरक्षेसाठीच नाही तर सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत.

या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, एमबीएमसीने ३६ शाळांमध्ये २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यामार्फत एकूण १०,००० विद्यार्थ्यांचे निरीक्षण केले जात आहे. सतत देखरेख केल्याने कोणत्याही घटनेवर तातडीने कारवाई करता येते. एमबीएमसी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्व व कौशल्य चाचण्या घेतल्या जात आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आयोजित कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सुविधेचे उद्घाटन भारतरत्न गानसम्राद्नी लता मंगेशकर नाट्यगृहात केले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई,  खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, आमदार जनेश्वर म्हात्रे, आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार गीता जैन यांनी ऑनलाइन माध्यमातून हजेरी लावली.

हा उपक्रम सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठीच नाही तर ती विद्यार्थ्यांना आणि पालकांना खरोखर जाणवावी यासाठी केलेला प्रयत्न असून भविष्यात जबाबदार व सशक्त नागरिक घडवण्यासाठी त्याची वचनबद्धता दर्शवतो.

Leave a Comment