Eknath Shinde: आशा स्वयंसेविका सरकारची मोठी घोषणा, मिळणार 10 लाख रुपये

Eknath Shinde: राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना मोठा दिलासा दिला आहे.

राज्य सरकारकडून आता आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये तर कायमस्वरूपी अपंगत्व झाल्यास 5 लाख रुपये मिळणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,01 एप्रिल 2024 पासून हा निर्णय करण्यात येणार असून राज्य सरकारने यासाठी प्रति वर्ष अंदाजित 1.05 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

याच बरोबर या निर्णयासाठी आवश्यक निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची देखील माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्य सरकारला याच्या फायदा होऊ शकतो अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने मोठा निर्णय घेत आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 5 हजाराची वाढ केली होती.

Leave a Comment