Eknath Shinde । आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांसाठी सरकारची मोठी घोषणा! होणार 10 लाखांचा फायदा

Eknath Shinde । नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यात सार्वजनिक आरोग्य विभागातून राज्यातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तक यांचा समावेश आहे.

दरम्यान, राज्यातील महत्त्वाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येते. महत्त्वाचे म्हणजे त्यांची अंमलबजावणी देखील आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका करतात. या सेविका सरकार आणि सर्वसामान्य जनता यांच्यामधील महत्त्वाच्या दुवा आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना अनेकदा सरकारचे काम करताना प्रवास करावा लागतो. अनेकदा अपघाताची घटना घडली तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचं काय? असा प्रश्न निर्माण होतो. हाच मुद्दा लक्षात घेऊन सरकारने या आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि गट प्रवर्तकांसाठी विशेष विमा योजनेची घोषणा केली आहे.

याबाबत राज्य सरकारने एक प्रसिद्धी पत्र जारी केले आहे . आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. अपघाती मृत्यू झाला तर दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान दिले जावे, असे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले.

यासाठी प्रति वर्षी अंदाजे १ कोटी ५ लाख रुपये निधी मंजूर केला. हा निर्णय १ एप्रिल २०२४ पासून लागू केला जाणार आहे. सध्या ७५ हजार ५७८ अशा स्वयंसेविका आणि ३६२२ गटप्रवर्तक कार्यरत आहेत. त्या आरोग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळत असून हे करताना अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर त्यांना आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment