Eknath Shinde । राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, ‘या’ लोकांवर होणार कठोर कारवाई

Eknath Shinde । राज्य सरकारने आता दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. भेसळ रोखण्यासाठी एमपीडीएपेक्षाही कठोर कायदा करावा लागणार आहे. अन्न पदार्थातील भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी केंद्राला शिफारस होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांनी संयुक्त मोहीम प्रभावीपणे राबवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी व्ही. रमणी पॅटर्न राबविणे, राज्यातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविषयी आयोजित संयुक्त बैठकीत एकनाथ शिंदे बोलत होते.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, माजी आमदार सुरेश धस यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अन्न व औषश प्रशासन विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे आणि केंद्रीय एफएसएसएआयचे अधिकारी उपस्थित होते.

अद्ययावत प्रयोगशाळा, उपकरणे, मोबाईल प्रयोगशाळा यांसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल. दुधातील भेसळीचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसेल. नागरिकांच्या आरोग्यावर दूरगामी दुष्परिणाम होतात. हे अतिशय चिंताजनक आहे. याला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे गरजेचे असून तातडीची उपाय योनजा म्हणून या दोन्ही विभागांनी संयुक्त मोहीमा आखणे गरजेचे आहे.

Leave a Comment