आली रे आली…! या परीक्षेची उत्तरपत्रिका (Answer Key) आली..जाणून घ्या डाऊनलोड कसं करायचं…
बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा देणं अत्यंत गरजेचं होतं. त्यामुळे गेल्या आठवड्यात 26, 27, 31 ऑगस्ट आणि 1 आणि 2 सप्टेंबर रोजी झालेल्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा देणाऱ्या उमेगवारांना आपले उत्तरं तपासण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार उत्तरांवर आक्षेप नोंदवण्यासाठी जेईई मेन (JEE Main) कडून उत्तरपत्रिका जारी करण्यात आली आहे.
दिल्ली : कोरोनामुळे लांबलेल्या परीक्षा आता पार पडायला सुरूवात झाली आहे. सरकारने कोरोना निर्बंध शिथील केल्यानंतर पार पडलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका (Answer Key) कडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र आता विद्यार्थ्यांसाठी करीयरच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली आहे.
बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा देणं अत्यंत गरजेचं होतं. त्यामुळे गेल्या आठवड्यात 26, 27, 31 ऑगस्ट आणि 1 आणि 2 सप्टेंबर रोजी झालेल्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा देणाऱ्या उमेगवारांना आपले उत्तरं तपासण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार उत्तरांवर आक्षेप नोंदवण्यासाठी जेईई मेन (JEE Main) कडून उत्तरपत्रिका जारी करण्यात आली आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)द्वारे जेईई मेन्स परीक्षेच्या सीजन 4 चे उत्तरं (Answer key) अपलोड करण्यात आले आहेत. त्यावर हरकती दाखल केल्यानंतर अंतिम उत्तरं जारी केली जातील. त्यासाठी NTA लवकरच अधिकृत वेबसाईटवर प्रोव्हिजनल एन्सर की जारी करणार आहे. तसेच उत्तरपत्रिकेसोबत प्रतिसाद पत्रिका देखील जारी करण्यात येणार आहे. ज्याद्वारे जेईई मार्किंग सिस्टीमनुसार उमेदवार स्वतःचे मुल्यमापन स्वतः करू शकेल. तसेच अभियांत्रिकी पदवीसाठी किंवा आर्किटेक्चर महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्याच्या बाबतीत अंदाज लावू शकतात.
अशी करा Answer Key डाऊनलोड…
- jeemain.nta.nic.in वर NTA च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- त्यानंतर समोर उघडलेल्या विंडोमध्ये जेईई मेन 2021 सीजन 4 (JEE Main 2021 Seasion 4) Answer Key वर क्लिक करा.
- तुमचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर जेईई मेन्स उत्तरपत्रिका (Answer Key) स्क्रीनवर दिसेल.
- ते डाऊनलोड करा आणि आपली उत्तरं तपासा.
- याबरोबरच उमेदवार उत्तरपत्रिकेची प्रिंट घेऊ शकतात तसेच ते पुढील संदर्भासाठी स्वतःकडे ठेवू शकतात.