Take a fresh look at your lifestyle.

..तर ‘त्या’ शिक्षकांना येणार अच्छे दिन; पहा कोणत्या पत्रामुळे वाढल्यात अपेक्षा

पुणे : प्राथमिक शिक्षकांना शिक्षण विभागात वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी देण्याची मागणी जुनी आहे. जिल्हा परिषद आणि राज्य सरकारच्या शिक्षण विभागात असे अनुभवी आणि उच्चशिक्षित शिक्षक कार्यरत असतील तर त्याचा मोठा फायदा राज्याच्या एकूण शिक्षण विभागाला होईल. त्यासाठीच आता शिक्षक संघटना आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी कंबर कसली आहे.

Advertisement

येत्या पावसाळी अधिवेशनात शिक्षकांच्या या जुन्या व दुर्लक्षित मागणीवर निलंगेकर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. त्याबाबत विधिमंडळ कामकाजाचे ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी उल्हास कावरे यांचे पत्र मोठ्या प्रमाणात शिक्षकांमध्ये व्हायरल होत आहे. त्यानुसार जर यावर पुढील कार्यवाही झाली तर अनेक शिक्षकांना अच्छे दिन येणार आहेत. पत्रातील मुद्द्यानुसार शालेय शिक्षण विभागात रिक्त असलेल्या वर्ग १ आणि वर्ग २ या आस्थापनेवरील विस्तार अधिकारी या प्रशासकीय अधिकारी पदावर जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या पीएचडी पदवीधारक शिक्षकांना संधी देण्याची मागणी आहे.

Advertisement

या तारांकित प्रश्नानुसार आता राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना याबाबतची माहिती संकलित करून पाठवण्याचे निर्देश आहेत. तसेच या मागणीसाठी आतापर्यंत प्राप्त झालेले पत्र आणि त्यावरील कार्यवाही याचीही माहिती मागविण्यात आलेली आहे. सर्व जिल्हा परिषदेत याबाबतची माहिती संकलित केली जात आहे. यावर कार्यवाहीस विलंब झाल्याची कारणे कोणती याबाबतही यात खुलासा मागवण्यात आलेला आहे.

Advertisement
  • Advertisement

    कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply