Edible Oil Price : दररोज वाढत असणाऱ्या या महागाईत सर्वसामान्यांना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या आवाहनानंतर खाद्यतेल उत्पादक कंपन्यांनी खाद्यतेलच्या दरात कपात केली आहे.
फॉर्च्युन, जेमिनी या तेल ब्रँडच्या तेलाच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तर मदर डेअरीने ‘धारा’ ब्रँड अंतर्गत विकल्या जाणार्या खाद्यतेलाची कमाल किरकोळ किंमत (MRP) प्रति लिटर 15 ते 20 रुपयांनी कमी केली आहे.
धाराने किंमत 20 रुपयांनी कमी केली
दर कपातीनंतर धारा रिफाइंड सोयाबीन तेलाची (एक लिटर पॅक) किंमत 170 रुपयांवरून 150 रुपयांवर आली आहे. धारा रिफाइन्ड राइस ब्रानची किंमत 190 रुपयांवरून 170 रुपये प्रति लिटरवर आली आहे. धारा रिफाइन्ड सूर्यफूल तेलाची किंमत 175 रुपयांवरून 160 रुपये प्रति लिटरवर आली आहे. त्याचप्रमाणे धारा शेंगदाणा तेलाची किंमत 255 रुपयांवरून 240 रुपये प्रतिलिटर झाली आहे.
या कंपन्यांनीही किमती कमी केल्या
धारा व्यतिरिक्त इतर काही कंपन्यांनीही किमती कमी केल्या आहेत. ऑईल ब्रँड फॉर्च्युन आणि जेमिनी एडिबल अँड फॅट्स इंडियाने आपल्या तेल ब्रँड जेमिनीच्या किंमतीत प्रति लीटर 5 ते 10 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, 2 मे रोजी शेंगदाणा तेलाचा भाव 189.95 रुपये प्रति लिटर, मोहरीचे तेल 151.26 रुपये प्रति लिटर, सोया तेल 137.38 रुपये, सूर्यफूल तेल 145.12 रुपये प्रति लिटर आहे.
पुढील आठवड्यापासून त्याचा परिणाम दिसून येईल
किंमत कपात तत्काळ प्रभावाने लागू आहे. नवीन एमआरपीसह धारा तेल पुढील आठवड्यात बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अन्न मंत्रालयाने खाद्यतेल उद्योग संस्था सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) ला स्वयंपाकाच्या तेलाच्या किंमती कमी करण्याचे निर्देश दिले होते.