Rahul Gandhi ED Summon: लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणीत वाढवण्याची शक्यता आहे. याचा कारण म्हणजे आज अंमलबजावणी संचालनालय महणजेच ED राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या प्रकरणातील मनी लाँड्रिंग तपासासंदर्भात चौकशीसाठी समन्स पाठवू शकते.
या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, काँग्रेस नेत्याची नव्याने चौकशी करावी लागेल कारण एजन्सीला या अनियमिततेचा तपास पूर्ण करायचा आहे. या प्रकरणात ईडीने यापूर्वीच 751 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांची यापूर्वी जून 2022 मध्ये झालेल्या चार बैठकांमध्ये यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडच्या दैनंदिन कामकाजातील त्यांच्या भूमिकेबद्दल ईडीने सुमारे 40 तास चौकशी केली होती.
हे संपूर्ण प्रकरण 2010 मध्ये गांधी परिवाराच्या मालकीच्या यंग इंडियन लिमिटेड या कंपनीशी संबंधित आहे. ज्याची सुरुवात सुमारे 5 लाख रुपयांच्या भांडवलाने झाली, परंतु ईडीच्या तपासानुसार, आज त्या कंपनीच्या मालकीच्या मालमत्तेचे बाजार मूल्य सुमारे 800 कोटी रुपये आहे.
याआधीही नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी झाली आहे. 2022 साली याच नॅशनल हेराल्ड आणि असोसिएटेड जर्नल लिमिटेड प्रकरणात काँग्रेस पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची ईडीने चौकशी केली होती.
तर दुसरीकडे काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी एक ट्विट करत आपल्याला घरी लवकरच ED येणार आहे आणि मी त्यांच्या स्वागतासाठी तयार आहे असं ट्विट केलं होतं.