ED News: मुंबई : आयकर, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआय यांसारख्या तपास यंत्रणांनी (investigating agencies like Income Tax, Enforcement Directorate (ED) and CBI have conducted raids) अनेक ठिकाणी छापे टाकल्याची बातमी तुम्ही दररोज वाचली असेलच. यात अनेक बड्या लोकांच्या आणि नेत्यांच्या तसेच त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. विशेषत: यात भाजप नेते, कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटना यांना सध्या वगळले जात आहे. त्यावरून या स्वायत्त म्हणवल्या जाणाऱ्या संस्थेवर टीका होत आहे. अशावेळी कोणताही सामान्य व्यापारी किंवा नोकरदार या ईडीच्या फेऱ्यात अडकू शकतो.

ईडीच्या छाप्यात या एजन्सींना शेकडो कोटींची रोकड मिळाली, अशी बाटमिया आता रोजची झाली आहे. लोकांना फक्त आकडे ऐकून घेऊन दुर्लक्ष करण्याची सवय लागली की काय अशीच शंका येण्यासारखी स्थिति आहे. यातील सर्वात मोठा छापा ईडीने नुकताच पश्चिम बंगालमध्ये टाकला आहे. तेथे अर्पिता मुखर्जी (ED in West Bengal Arpita Mukherjee’s house) यांच्या घरातून 50 कोटींची रोकड जप्त केल्याचे म्हटले आहे. पण इथे एक महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न येतो की शेवटी एक भारतीय त्याच्या घरात किती रोख ठेवू शकतो. तुमच्यासाठीही या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणे महत्त्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या एजन्सीची भीती वाटू नये. म्हणून ही माहिती देण्याचा खटाटोप. आयकर विभागाच्या नियमांनुसार तुम्ही किती रोकड ठेवू शकता हे आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत. या नियमांनुसार तुम्ही घरात हवी तेवढी रोकड ठेवू शकता. परंतु एजन्सीने तपास केल्यास त्या रोखीचा स्रोत सांगणे आवश्यक आहे. जर तुम्ही प्रामाणिकपणे पैसे कमावले असतील तर तुमच्याकडे स्त्रोत असणे आवश्यक आहे. त्याची कागदपत्रे तुमच्याजवळ असतील. परंतु तसे नसल्यास, तुम्ही अडचणीत येऊ शकता.

एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही जे काही रोखीने कमावता, त्याची कागदपत्रे ठेवा आणि आयकर विवरणपत्र भरा. यामुळे तुम्ही टेन्शन फ्री व्हाल. तुम्ही असे न केल्यास आणि रोख रकमेचा स्रोत सांगू शकला नाही, तर तुमच्यावर कारवाई केली जाईल. अशावेळी मोठा दंड आकारला जाईल. (whatever you earn in cash, keep the papers of it and fill the income tax return) लक्षात ठेवा, जर तुम्ही घरात ठेवलेल्या पैशाचा स्रोत सांगू शकत नसाल तर 137 टक्क्यांपर्यंत दंड होऊ शकतो. दुसरे म्हणजे, आर्थिक वर्षात रोखीने 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहार झाला तरी दंड आकारला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे रोखीचे इतरही काही नियम आहेत. उदाहरणार्थ, CBDT नुसार, जर तुम्हाला 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेत जमा करायची असेल किंवा काढायची असेल, तर पॅन क्रमांक आवश्यक (PAN number will be required) असेल.

जर आपण एका वर्षात 20 लाख रोख जमा केले तर पॅन आणि आधार क्रमांकाची माहिती आवश्यक असेल. असे न केल्यास, पॅन आणि आधारचा तपशील न दिल्यास 20 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. त्याचप्रमाणे 2 लाख रुपयांचीही मर्यादा आहे. तुम्ही यापेक्षा जास्त रोखीने खरेदी करू शकत नाही. जर तुम्हाला 2 लाख रुपयांपेक्षा जास्तीची खरेदी रोखीने करायची असेल तर पॅन आणि आधार कार्डची प्रत आवश्यक असेल. जर तुम्ही 30 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची मालमत्ता खरेदी-विक्री केली, तर एजन्सी येऊ शकते. तुम्ही एका दिवसात नातेवाईकांकडून 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख घेऊ शकत नाही. यासाठी बँकेतून व्यवहार करावे लागतील. रोखीने कोणतेही देणगी केवळ 2 हजार रुपये निश्चित आहे. दोन व्यक्ती एकमेकांना 20 हजार रुपयांपेक्षा जास्त रोखीने कर्ज देऊ शकत नाहीत. 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम बँकेतून पैसे काढले तर टीडीएस आकारला जाईल.

Share.

Leave A Reply

Exit mobile version