E-Waste : ई-कचरा (E-Waste) निर्मितीच्या बाबतीत भारत (India) हा जगातील पाचव्या क्रमांकाचा देश आहे. भारतात दरवर्षी सुमारे एक दशलक्ष इलेक्ट्रॉनिक कचरा (Electronic waste) निर्माण होतो, ज्यामध्ये सर्वात मोठी संख्या संगणकीय कचऱ्याची (Computer waste) असते. या कचऱ्यात ७० टक्के जड धातू (Heavy Metals) आढळतात, त्यात शिशाचे (Lead) प्रमाणही जास्त असते. भयावह बाब म्हणजे, भारतात एवढा ई-कचरा असतानाही केवळ १० टक्के इलेक्ट्रॉनिक कचरा जमा होतो. जगभरात १६ अब्जाहून अधिक मोबाईल फोन (Mobile phone) वापरात आहेत, जे जगाच्या लोकसंख्येच्या जवळपास तिप्पट आहे. यापैकी जवळपास एक तृतीयांश फोन वापरले जात नाहीत. पुढील सात ते आठ वर्षांमध्ये, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक कचरा (Electric and Electronic Waste) ७४ दशलक्ष टन दराने वाढेल. या ई-कचऱ्यामध्ये स्मार्टफोन (Smartphone) तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील (Electronic Equipment) कचऱ्याचा समावेश आहे. म्हणूनच की काय, हा कचऱ्याचा भडीमार भारतासाठी डोकेदुखी (Headache) ठरतो आहे.
- Business Stock News : म्हणून झाली श्री सिमेंटच्या शेअरमध्ये ४ टक्क्यांनी घसरण
- Health Tips: ‘या’ रुग्णांनी दुपार आणि रात्रीच्या जेवणानंतर करा हे काम; राहील आरोग्य चांगले
- Jalgaon news : “हायड्रो डायर यंत्र” फराळातील तेलाचा अंश कमी करण्यासाठी वापरा हायड्रो डायर यंत्र
- Pune Politics : या पक्षांच्या गैरकारभारामुळे पुणेकरांना शिक्षा
२०२० च्या जागतिक ई-कचरा मॉनिटरनुसार (E-waste Moniter), निकामी सेल (Defunct cell phone) फोन हे दरवर्षी तयार होणाऱ्या ४४.४८ दशलक्ष-टन जागतिक इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या (Global electronic Waste) हिमखंडाचे फक्त एक टोक आहे ज्याचा पुनर्वापर केला जात नाही.
जून ते सप्टेंबर २०२२ या सहा युरोपीय देशांमध्ये (European Countries) केलेल्या सर्वेक्षणानुसार, चलनातून काढून घेतलेल्या पाच अब्ज फोनपैकी बरेच फोन कचऱ्यात टाकण्याऐवजी साठवले गेले आहे.
आपल्याकडे असलेले अनेक खराब झालेले स्मार्ट फोन आपण रिसायकलिंग (Recycling) न करत ते घरातच ठेवून घेतो. मात्र हेच स्मार्टफोन आपला जीव धोक्यात घालू शकता, असं वेस्ट इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट (Waste Electrical and Electronic Equipment) च्या अहवालात धक्कादायक खुलासा करण्यात आलायं. आजच्या डिजिटल (Digital) युगात रोजच स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानात (Technology) झपाट्याने बदल होतांना दिसत आहे. स्मार्टफोनचे जलद अपग्रेड (Upgrade) हवामान (Weather) आणि निसर्गासाठी (Nature) एक मोठा धोका बनला आहे. २०२२ मध्ये हे स्मार्टफोन भारताच्या लोकसंख्येच्या चौपट लोकसंख्येतील ई-कचरा (E-Waste) बनतील. म्हणजेच, जगभरात सुमारे ५.३ अब्ज फोन हे फेकले जातील. यामुळे पर्यावरणावर (Environment) तसेच मानवी आरोग्यावर (Human Health) त्याचा विपरित परिणाम कसा होऊ शकतो हे पुढील आकडेवारीवरून स्पष्ट करता येईल, असे डब्ल्यूईईई (WEEE) ही इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या प्रतिबंधावर काम करण्याऱ्या संस्थेने एका अहवालात सांगितले आहे.
जुन्या फोनचा वापर हा मानवी आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असून पर्यावरणीय दृष्टीकोणातून घातक आहे. अशा वेळेस या स्मार्ट फोनमधील मौल्यवान वस्तूंचा (Expensive things) पुनर्वापर करणे (Reuse) हा सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र, आपला स्मार्टफोन आपल्याला प्रिय वाटतो, त्यामुळे तो फोन खराब झाला तरी कचऱ्यात टाकत नाही. खराब स्मार्टफोनमध्ये ६० पेक्षा जास्त धातू असू शकतात. आयफोनच्या पार्ट्समध्ये सोने(Gold), चांदी (Silver) आणि पॅलेडियमसारखे (Palladium) मौल्यवान धातू देखील असतात, याबाबत लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव आहे. परिणामी, स्मार्टफोन पासून होणारे धोके किवा हानी याबाबतच वापरकर्त्याचं अज्ञान हे सुध्दा ई-कचऱ्याचं कारण असू शकतं. खराब स्मार्टफोनचे हे घटक मानवी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, असे डब्ल्यूईईई स्पष्ट केले आहे.