Dubai Floods | बाब्बो..! काही तासांतच कोसळला दीड वर्षातला पाऊस; दुबई ‘डुबई’ होण्याचं कारणही धक्कादायक

Dubai Floods : जगातील अनेक देश सध्या कडाक्याच्या उन्हाळ्याला तोंड (Dubai Floods) देत आहेत. परंतु संयुक्त अरब अमीरात, ओमान आणि बहरीनमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. या देशात शक्यतो पाऊस पडत नाही. परंतु यावेळी इतका मुसळधार पाऊस झाला आहे की दुबईतील रस्त्यात पाणीच पाणी साचले आहे. नागरिकांच्या घरात, शॉपिंग मॉल्समध्येही पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. इतकेच नाही तर विमानतळ, मेट्रो रेल्वे स्टेशनही पाण्याखाली गेले आहे. दुबईत सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी इतका पाऊस (Dubai Rain) पडला की वर्षभरात देखील इतका पाऊस कधी पडला नव्हता. मंगळवारी दुबईमध्ये 142 मिमी पावसाची नोंद झाली. येथे वर्षभरात सरासरी केवळ 95 मिमी पाऊस पडतो. यावरून अचानक इतका पाऊस कसा पडला याचा अंदाज बांधता येईल.

दुबईमध्ये इतका पाऊस कधी पडलेला नाही. त्यामुळे अचानक उद्भवलेल्या या संकटासाठी शहर तयार नव्हते. याचा परिणामही दिसून आला शहरात रस्त्यावर पाणीच पाणी साचले. विमानतळ, मोठमोठ्या इमारती, मेट्रो रेल्वे स्टेशन, बस स्टेशन पाण्याखाली गेले. शेजारील ओमान या देशात पावसाने थैमान घातले येथे मुसळधार पावसामुळे 18 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ज्या देशात कधीच इतका पाऊस पडत नाही त्या देशात अचानक इतका पाऊस कसा पडला? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू या..

India China Relations : चीनचा डाव! भारतानेही दिले रोखठोक उत्तर; पहा, पुन्हा का धुमसतोय भारत-चीन वाद?

Dubai Floods

युएई, ओमान, बहरीन या देशांमध्ये अचानक इतका पाऊस झाला यामागे काही कारणे आहेत. यातील सर्वात मोठे कारण म्हणजे एक मोठे वादळ अरबी दीपकल्पातून ओमानच्या आखाताकडे सरकत होते. या ऋतुचक्रामुळे ओमान आणि दक्षिण पूर्व इराणकडे ओलावा असलेले वारे ढग घेऊन गेले आणि येथेही जोरदार पाऊस झाला. हवामान तज्ज्ञ देखील ग्लोबल वार्मिंगचे कारण यासाठी मानत आहेत. या हवामानाच्या घटनेचे कारण जे आगामी काळात आणखी वाढेल.

जगातील कोणत्याही क्षेत्रात निसर्गाशी छेडछाड करण्याचे परिणाम हजारो किलोमीटर दूरवर दिसून येतात. एवढे अचानक झालेल्या पावसामध्ये क्लाऊड सीडींग हे देखील एक कारण असू शकते अशी चर्चा आता सुरू झाली आहे. काही तज्ज्ञ देखील क्लाऊड सीडिंग हे यामागे कारण असल्याचे मानत आहेत. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने आपल्या अहवालात अशी शक्यता व्यक्त केली आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ यांनी ब्लूमबर्गला सांगितले की क्लाऊड सीडींगसाठी बनवलेल्या विशेष विमानांनी मागील दोन दिवसात क्लाऊड सीडिंगसाठी सहा वेळा उड्डाण केले होते.

China PLA War : चीनची खुमखुमी वाढली! चीनी आर्मीची घोषणा; ‘या’ कारणासाठी होणार अब्जावधींचा खर्च

Dubai Floods

या प्रक्रियेत एक रासायनिक सिल्वर आयोडाईड विमानांद्वारे फवारले जाते. परंतु यासाठी ढगांमध्ये पुरेसा पुलावा असणे गरजेचे आहे. सिल्वर आयोडाइडचे कण केंद्रक म्हणून काम करतात. ज्या भोवती पाण्याचे कण जमा होऊ लागतात आणि थेंब तयार होतात. ते जेव्हा जास्त होतात तेव्हा पाऊस पडतो. परंतु युएई सिल्वर आयोडाइडसारख्या केमिकलऐवजी पोटॅशियम क्लोराइडसारख्या नैसर्गिक क्षारांचा वापर करते. मात्र यावेळी संयुक्त अरब अमिरात सरकारने क्लाऊड सीडिंग केले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नैसर्गिक कारणांमुळे पाऊस झाला असे म्हटले तरी दुबईची अशी अवस्था का झाली असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुबईच्या शहरी व्यवस्थेचा मोठा भाग अशा पावसासाठी कधीच तयार नव्हता. असे तज्ज्ञ सांगत आहेत. तुम्ही सारखे आधुनिक शहरातही पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेज सिस्टीम अत्यंत मर्यादित आणि पायाभूत सुविधांमध्ये अपुरी आहे आणि या पावसाने शहरातील आपत्कालीन यंत्रणा किती कमकुवत आहे हे दाखवून दिले.

Leave a Comment