Driving License Rules : लक्ष द्या! ‘या’ लोकांनी चुकूनही चालवू नये 1 जूननंतर गाडी, भरावा लागेल 25 हजारांचा दंड

Driving License Rules : भारतात दररोज कोठे ना कोठे अपघात होतात. या अपघातामुळे अनेकांचा जीव धोक्यात येतो. वाढते अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी अनेक नियम कठोर करण्यात आले आहेत.

१ जूनपासून वाहतुकीशी संबंधित नवीन नियम लागू होणार असून यामुळे काही लोकांची समस्या वाढू शकते. इतकेच नाही तर त्यांना चांगला दंडही भरावा लागू शकतो.

१ जूनपासून लागू होणार नवीन नियम

1 जून 2024 पासून सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय कडून ड्रायव्हिंगशी संबंधित नवीन नियम जारी केले जाणार आहेत. कमी वयाच्या व्यक्तीने वेगात वाहन चालवले तर त्यांना मोठा दंड भरावा लागणार आहे. नियमानुसार, एखाद्याने जास्त वेगाने गाडी चालवली तर त्याला 1000 ते 2000 रुपये दंड भरावा लागणार आहे.

भरावा लागेल 25 हजार रुपये दंड

नियमांनुसार, विहित मर्यादेपेक्षा कमी म्हणजे अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवले तर 25,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. 18 वर्षांखालील व्यक्ती वाहन चालवताना सापडले तर त्याला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. इतकेच नाही तर दंडाव्यतिरिक्त वाहन मालकाचा ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द होऊ शकतो. अल्पवयीन व्यक्तीला वयाच्या 25 वर्षापर्यंत परवाना मिळणार नाही.

कधी मिळते ड्रायव्हिंग लायसन्स?

ड्रायव्हिंग लायसन्स वयाच्या १८ व्या वर्षी बनवता येते, पण तुम्हाला हे माहिती आहे का की ड्रायव्हिंग लायसन्स वयाच्या १६ व्या वर्षीही बनवता येते. खरं तर, वयाच्या १६ व्या वर्षीही ५० सीसी क्षमतेची मोटारसायकल चालवण्याचा ड्रायव्हिंग लायसन्स मिळते. तुम्ही १८ वर्षांचे झाल्यावर ते परवाना अपडेट करता येते.

ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता

DL ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्यापासून 20 वर्षांसाठी वैध असून ड्रायव्हिंग लायसन्स 10 वर्षांनंतर आणि 40 वर्षांनंतर 5 वर्षांनंतर जारी केले जाते. यासाठी तुम्हाला शासकीय प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स अपडेट करून घ्यावा लागणार आहे.

Leave a Comment