DRDO Recruitment 2022: पुणे : सरकारी नोकरीच्या (government jobs) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (Defense Research and Development Organization / DRDO) ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. त्यांनी बंपर पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. अधिकृत अधिसूचनेनुसार एकूण 1901 पदांची भरती करण्यात आली आहे. (Ministry of Defense, Government of India, has invited applications for the bumper posts)
या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2022 आहे. पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट www.drdo.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे देखील यासाठी अर्ज करू शकतात. अर्जाशी संबंधित महत्त्वाच्या तारखा :
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 3 सप्टेंबर 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2022
- वय मर्यादा : या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे.
- पदांची संख्या : एकूण पदे – 1901
- पात्रता : वेगवेगळ्या पदांसाठी पात्रता वेगळी आहे. पात्रतेच्या अधिक तपशीलांसाठी, खाली दिलेली अधिकृत अधिसूचना पहा.
- अर्ज फी : सामान्य – 100; SC/ST – शून्य
- निवड प्रक्रिया : या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.