Pune School : जर तुम्ही देखील पुण्यात मुलांचा शाळेत प्रवेश करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहेत.
जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात 49 शाळा अनधिकृत आहे. त्यापैकी शिक्षण विभागाकडून 13 शाळा बंद करण्यात आले आहे.
तर 10 शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याच बरोबर 10 शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे.
माहितीनुसार, 49 अनधिकृत शाळांपैकी काही शाळा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आणि काही शाळा पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात या शाळांवर कारवाई होत आहे.
बंद केलेल्या शाळांची नावे
1. किड्जर्जी स्कुल, शालीमार चौक दौंड
2. जिजाऊ एज्युकेशन सोसायटी अभंग शिशु विकास कासुर्डी, दौंड
3. यशश्री इंग्लिश मिडीयम स्कुल सोनवडी, दौंड
4. भैरवनाथ इंग्लिश मिडियम स्कुल मोई, खेड
5. संस्कृती इंटरनॅशनल स्कुल, आंबेगांव खुर्द, हवेली
6. श्रीमती सुलोचनाताई झेंडे बाल विकास मंदिर व प्राथमिक विद्यालय, कुंजीरवाडी
7. रिव्हस्टोन इंग्लिश मिडीयम स्कुल, पेरणे फाटा
8. सोनाई इंग्लिश मिडीयम स्कूल, फुरसुंगी
9. श्रेयान इंटरनॅशनल स्कुल साईनगर गहुंजे, ता. मावळ
10. व्यंकेश्वरा वर्ल्ड स्कूल, नायगांव, ता. मावळ
11. माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कुल, कासारवाडी
12. श्री. चैतन्य इंग्लिश मिडीयम स्कुल विशालनगर, पिंपळे निलख
13. केअर फौंडेशन पुणे संचलित इमॅन्युअल पब्लिक स्कुल, महंमदवाडी रोड, हडपसर