Car Loan Tips : कार लोन घेताय? विसरू नका काही गोष्टी, नाहीतर भरावा लागेल जास्त ईएमआय

Car Loan Tips : अनेकजण कर्ज काढून कार घेत असतात. जर तुम्ही कर्ज काढून कर्ज घेत असाल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. नाहीतर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

कमी व्याजदरात घ्या कर्ज

हे लक्षात घ्या की कार लोन घेण्यापूर्वी, तुम्हाला कमी व्याजदरात कोणती बँक कर्ज देऊ शकते हे पाहण्यासाठी तुम्हाला नेहमी सर्व बँकांचे व्याजदर तपासणे गरजेचे आहे. इतकेच नाही तर सर्वात कमी व्याजदराने कार लोन घ्या. कमी व्याजदरामुळे, तुम्हाला मूळ रकमेपेक्षा जास्त पैसे देण्याची गरज पडणार नाही.

जाणून घ्या कर्जाचा कालावधी

कार लोन घेताना त्याचा कालावधी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर नंतर तुम्हाला खूप पश्चाताप होऊ शकतो. अनेक वेळा स्वस्त ईएमआय मिळवण्यासाठी लोक त्यांचा ईएमआय दीर्घकाळ फिक्स करून घेत असल्याने कारचे कर्ज फेडताना त्याला काळजी वाटू लागते. असे झाले तर तुमचे खूप नुकसान होते कारण तुम्ही व्याजदराच्या स्वरूपात बँकेला जास्त पैसे भरत असता. म्हणून, कार कर्जाचा कालावधी नेहमी किमान ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला कमी व्याज द्यावे लागणार आहे.

शेवटच्या तारखेपूर्वी भरा EMI

तुम्ही तुमचा EMI नेहमी देय तारखेपूर्वी भरणे गरजेचे आहे. वेळेवर ईएमआय भरला नाही तर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो. यासोबतच तुम्हाला पेनल्टी चार्ज देखील भरावा लागणार आहे.

…तर मिळेल कर्ज ऑफर

समजा जर तुम्ही महागडी कार घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचा सिव्हिल स्कोअर चांगला नसल्यास तर तुम्ही ती सुधारण्यासाठी आतापासूनच कामाला लागा. तुमचा सिव्हिल स्कोअर 750 च्या वर असेल तर तुम्हाला मोठी कर्ज ऑफर मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment