Donald Trump vs Joe Biden : ठरलं तर! निवडणुकीत ट्रम्प अन् बायडेन पुन्हा भिडणार; जाणून घ्या, अमेरिकेतील अपडेट

Donald Trump vs Joe Biden : अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची तयारी सुरू (Donald Trump vs Joe Biden) झाली आहे. यावेळीही माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यात टक्कर होईल अशी चिन्हे दिसत आहेत. कारण, ट्रम्प यांनी रिपब्लीकन पक्षाच्या उमेदवार निक्की हेली (Nikki Haley) यांचा पराभव करत त्यांना या निवडणुकीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प रिपब्लीकन उमेदवारी जिंकतील आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (America Presidential Election) जो बायडेन यांच्या विरोधात उभे असतील.

भारतीय वंशाच्या निक्की हेली यांनी व्हरमाँटमधील प्राथमिक निवडणूक जिंकून ट्रम्प (Donald Trump) यांना जोरदार धक्का दिला होता. 98 टक्के मतमोजणीनंतर हेली यांना 49.9 टक्के तर डोनाल्ड ट्रम्प यांना 45.8 टक्के मते मिळाली होती. वॉशिंग्टन डीसी येथील विजयानंतर निक्की हेली यांचा हा दुसरा मोठा विजय होता.

Philippines China Dispute : 11 कोटी लोकसंख्येचा देश पण, थेट चीनला भिडला; पहा, काय घडलं चीनी समुद्रात?

Donald Trump vs Joe Biden

सुपर ट्युजडे निवडणुकीनंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे 893 मते आहेत तर हेली यांना फक्त 66 प्रतिनिधींचा पाठिंबा आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासाठी किमान 1215 प्रतिनिधींचा पाठिंबा मिळणे आवश्यक असते. यापासून निक्की हेली आता बऱ्याच दूर दिसत आहेत.

दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्राथमिक निवडणुकीत कोणत्याही आव्हानाचा सामना करावा लागला नाही. आतापर्यंत त्यांनी सर्व डेमोक्रॅट प्राथमिक निवडणुका जिंकल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की आता बायडेन यांच्यासमोर डेमोक्रॅटिक नामांकनासाठी अन्य कोणताही नेता नाही. अशा परिस्थितीत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सरळ लढत होताना दिसेल.

America : रशियाला झटका! अमेरिकेकडून नव्या निर्बंधांची घोषणा, कारणही धक्कादायक

Donald Trump vs Joe Biden

डेमोक्रॅटिक पक्षात आजमितीस बायडेन यांना कुणीही प्रतिस्पर्धी नाही. त्यामुळे त्यांनी सर्व नामांकने जवळपास जिंकली आहेत. मिनेसोटामधील 19 टक्के मतदारांनी इस्त्रायल हमास युद्धात इस्त्रायलला पाठिंबा (Israel Hamas War) दिल्याबद्दल बायडेन यांच्याविरोधात मतदान केले. या व्यतिरिक्त अलबामा, कोलोरॅडो, आयोवा, मॅसाच्युसेट्स, नॉर्थ कॅरोलिना आणि टेनेसी या राज्यांतील मतदारांनीही अप्रतिबद्ध श्रेणीत मतदान करत आपला विरोध नोंद केला.

Leave a Comment