मुंबई : स्मार्टफोन आता दैनंदिन गरजेची वस्तू बनला आहे. स्मार्टफोनची स्क्रीन दीर्घ काळ चांगली राहावे, चुकून फोन पडल्यास त्याचं मोठे नुकसान होऊ नये, यासाठी अनेक जण स्क्रीन प्रोटेक्टर (Screen Protector) वापरतात. बाजारात सध्या दोन प्रकारचे स्क्रीन प्रोटेक्टर अर्थात ‘स्क्रीन गार्ड’ मिळतात. अर्थात, त्याच्या किमतीही दर्जानुसार कमी-जास्त आहेत. काही जण स्मार्टफोनला स्वस्तात उपलब्ध होणारी टेम्पर्ड ग्लास (Tempered Glass) प्रोटेक्टर म्हणून लावतात; पण त्यामुळे खरंच स्मार्टफोन सुरक्षित राहतो का, हा प्रश्न आहे.
बाजारात काचेची व प्लास्टिकची स्क्रीनगार्ड मिळते. स्मार्टफोन आणि त्याची स्क्रीन जास्त दिवस सुरक्षित राहावी, यासाठी अनेक जण स्क्रीनगार्ड वापरतात. तुलनात्मक विचार केल्यास प्लास्टिक स्क्रीनगार्डपेक्षा टेम्पर्ड ग्लास अधिक चांगली असते; मात्र बाजारात टेम्पर्ड ग्लासच्या नावावर साधी काच 100 रुपयांना मिळते. त्याचा दर्जा फारसा चांगला नसतो. त्यामुळे अशी स्क्रीनगार्ड वापरल्यास फोन सुरक्षित राहीलच याची खात्री नसते. फोन व स्क्रीन अधिक सुरक्षित राहावी, यासाठी 100 रुपयांऐवजी 1000 रुपयांची दर्जेदार टेम्पर्ड ग्लास वापरावी.
बाजारात मिळणारी 100 रुपयांची साध्या टेम्पर्ड ग्लास दर्जेदार नसते. तसेच, या काचेमुळे जखम होण्याची शक्यता असते. तसेच त्यामुळे स्क्रीन सुरक्षित राहीलच अशी खात्री नसते. त्यामुळे दर्जेदार टेम्पर्ड ग्लास वापरणं अधिक चांगलं ठरतं. दुसरीकडे, प्लास्टिक स्क्रीनगार्डविषयी बोलायचं झाल्यास हे स्क्रीनगार्ड मजबूत व टिकावू असतात. टेम्पर्ड ग्लासच्या तुलनेत प्लास्टिक स्क्रीनगार्डमुळे फोन अधिक सुरक्षित राहू शकतो.
हे स्क्रीनगार्ड टिकावू असल्याने दीर्घ काळ वापरता येतात; पण हा स्क्रीनगार्ड वापरण्याचे दुष्परिणामही आहेत. हे स्क्रीनगार्ड तयार करण्यासाठी प्रामुख्याने प्लास्टिकचा वापर केला जातो. त्यामुळे स्क्रीनवर लवकर स्क्रॅचेस (Scratches on mobile phone) पडू शकतात. स्क्रीनवर स्क्रॅचेस आणि डाग पडल्याने स्क्रीन पाहण्यात अडचणी येतात. तसंच त्यावर फिंगरप्रिंटचे डाग तसेच राहतात. त्यामुळे स्क्रीनसह युजर्सचंही नुकसान होऊ शकतं.
आता निवडणुका नाहीत.. मग, मोफत रेशन योजनेचे काय होणार ? ; पहा, काय सुरू आहेत हालचाली..
Russia-Ukraine War : रशिया निर्बंधांमुळे होणार मोठे नुकसान; पहा, चीनने कुणाला दिलाय ‘हा’ इशारा..