31 July : जुलै 2023 येत्या काही दिवसांत संपणार आहे. यामुळे देशात काही महत्त्वाच्या कामांची मुदतही संपणार आहे. यामुळे तुम्ही देखील ही महत्त्वाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावे नाहीतर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊया की कोणती कामे जुलै 2023 मध्ये पूर्ण करायची आहेत.
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख
ITR दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 आहे. म्हणजेच तारीख संपल्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही. 31 जुलैनंतर फॉर्म भरल्यास दंडही भरावा लागेल. इन्कम टॅक्स रिटर्न उशिरा भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2023 निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही या तारखेपूर्वी फॉर्म भरला नाही, तर तुम्ही रिटर्न फाइल करू शकणार नाही.
पॅन-आधार लिंक जोडण्याची तारीख
पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत 30 जून 2023 रोजी संपली आहे. ज्या नागरिकांनी अद्याप लिंक केलेले नाही त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. आयकर रिटर्न लिंकेशिवाय भरता येत असले तरी विभाग तुमच्या रिटर्नवर प्रक्रिया करणार नाही.
यामुळे पॅन-आधार लिंक करण्यात अयशस्वी झालेल्या नागरिकांना ₹ 1,000 दंड भरून त्यांचा पॅन आधारशी लिंक करावा लागेल. 30 जून 2023 पर्यंत दंड ₹500 होता.
HDFC बँक मुदत ठेव
खाजगी बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेव योजना आणली आहे ज्यामध्ये गुंतवणुकीची अंतिम तारीख 7 जुलै 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच या योजनेत गुंतवणूक करण्याची आज शेवटची तारीख आहे. 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षांसाठी सर्वाधिक व्याज दर 7.75 टक्के आहे.