Headphone : निरोगी राहण्यासाठी शरीरातील प्रत्येक यंत्रणा ठणठणीत असणे तितकेच महत्त्वाचे आहे. आज (3 मार्च) जागतिक श्रवण दिन ( World Hearing Day) आहे. गेल्या काही वर्षांत हेडफोन (Headphone), ईअरफोन किंवा इअर बड्स वापरण्याचा ट्रेंड वेगाने वाढला आहे आणि सगळ्यात जास्त आवाजात संगीत (Music) ऐकण्याचा ट्रेंड वाढला आहे.
तर आज आम्ही तुमच्या कानाबद्दल (Ears) काही महत्वाची माहिती देणार आहोत. ऐकण्याची समस्या जी जगभरातील एक गंभीर समस्या आहे. चंदिगड पीजीआयच्या ईएनटी विभागाकडून हा ताजा अहवाल आला आहे, ज्यामध्ये तज्ज्ञांनी अभ्यास केला असून तरुणांमध्ये वाढत्या ऐकण्याच्या समस्येबाबत दिलेला अहवाल आश्चर्यकारक आहे. रिपोर्टनुसार 24 तासांपैकी 2 तास इयरफोनवर गाणी ऐकणे धोकादायक ठरू शकते.
35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये अधिक तक्रारी
दुसरीकडे जे तरुण दोन तासांपेक्षा जास्त काळ मोठ्या आवाजात इअरफोनवर गाणी ऐकतात, त्यांची ऐकण्याची क्षमता वेगामे कमी झाली आहे. 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांमध्ये श्रवणशक्ती कमी झाल्याच्या तक्रारी अधिक आहेत. पूर्वी 45 ते 50 वयोगटातील लोक श्रवणशक्ती कमी झाल्याच्या तक्रारी घेऊन येत असत. 80 डेसिबलपेक्षा जास्त आवाज घातक असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
याचा थेट परिणाम आपल्या श्रवण पेशींवर होतो. तरुण बहुतेक 90 ते 100 डेसिबलवर गाणी ऐकतात. त्याच वेळी अहवालात म्हटले आहे, की दिवसात दोन तासांपेक्षा जास्त काळ इअरफोन वापरू नका. कमी ऐकू येत असलेल्या लोकांच्या तक्रारीच्या आधारे हा अभ्यास तयार करण्यात आला आहे. इयरफोन वापरणाऱ्या लोकांना दररोज नुकसान होते जे लोकांना समजत नाही.
इंडियन मेडिकल रिसर्चने (India Medical Research) 2020 मध्ये एक अभ्यास प्रकाशित केला होता. या संशोधनानुसार भारतात (India) 12 पैकी 1 व्यक्तीला ऐकण्याची समस्या आहे. भारतातील 6.3 टक्के लोकसंख्येला श्रवणशक्ती कमी होत आहे.
म्हैसूरमधील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग ऑडिओलॉजी विभागाच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे, की येथील 66 टक्के लोक आधुनिक गॅझेट वापरून संगीत ऐकण्यास प्राधान्य देतात. यापैकी 8 टक्के लोकांच्या ऐकण्याच्या क्षमतेत फरक आहे. 9.7 टक्के लोकांनी कानात शिट्टीसारखा आवाज होत असल्याची तक्रार केली. 4.5 टक्के लोकांना कानात अडथळा जाणवला.
त्याच वेळी, 5.6 टक्के लोकांना कानात जडपणा जाणवला. तुम्ही PLD म्हणजेच वैयक्तिक ऐकण्याचे साधन वापरल्यास तुमचे कान किती आवाज सहन करू शकतात? त्याची मर्यादा काय आहे? अभ्यासानुसार सामान्य संभाषणादरम्यान 60-65 डेसिबल आवाज तयार होतो, जो धोकादायक नाही.
तुमच्या आजूबाजूला आवाज, गोंधळाची पातळी 90 ते 95 डेसिबल असेल, तर ऐकण्याची समस्या असू शकते. जर तुमच्या आजूबाजूच्या आवाजाची पातळी 125 डेसिबलपर्यंत पोहोचली तर कानात वेदना सुरू होतात आणि जर या आवाजाची पातळी 140 डेसिबलपर्यंत पोहोचली तर व्यक्ती बहिरी होऊ शकते.