नवी दिल्ली : जगातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हवे असेल, तर ते गुगलवर शोधले जाते.. अगदी छोट्या-मोठ्या आजारांपासून ते स्वयंपाकघरातील रेसिपीपर्यंत प्रत्येक प्रश्नाचे समाधान गुगल करीत असते.. गुगलकडे (Google) प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. अर्थात गुगल सांगते, त्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे खरी असतात, असेही नाही.. कधी कधी गुगलही चुकू शकते..
‘गुगल’वर तुम्ही काय सर्च करता, यावर सतत नजर असते.. त्यामुळे जरी एकांकात तुम्ही नको त्या गोष्टी गुगलवर पाहत असाल, तर त्यावर ‘तिसरा डोळा’ सतत लक्ष ठेवून असतो.. त्यामुळे गुगलवर काही गोष्टी विचार करुन सर्च करा. चुकून काही आक्षेपार्ह पाहायला जाल, तर अडचणीत येण्याची शक्यता आहे.. कदाचित जेलची हवाही खावी लागू शकते. गुगलवर कोणत्या अशा गोष्टी आहेत, ज्या सर्च केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता, याबाबत जाणून घेऊ या…
बॉम्ब बनविण्याची पद्धत
बऱ्याचदा हाताला काही काम नाही म्हणून टाईमपास करण्यासाठी आपण मोबाईलवर वेळ घालवत असतो. एखाद्या गोष्टीशी आपला काहीही संबंध नसताना, उत्सुकतेपोटी अशा गोष्टी सर्च करीत असतो. त्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे, बॉम्ब बनवण्याची पद्धत.. तुम्हाला बाॅम्ब कसा बनवितात, याची उत्सुकता असेल नि गुगलवर चुकून सर्च करायला गेलात, तर अडचणीत येऊ शकतो. कारण, ही बाब सायबर सेलच्या नजरेत आल्यास नसती झंझट मागे लागू शकते.. सुरक्षा एजन्सीच्या चौकशीचा ससेमिरा नाहक तुमच्या मागे लागू शकतो. त्यामुळे जेलमध्येही जावं लागू शकतं.
प्रायव्हेट फोटो-व्हिडीओ
सोशल मीडियावर, गुगलवर प्रायव्हेट फोटो-व्हिडीओ लीक करणं हाही एक गंभीर गुन्हा आहे. त्यासाठीही जेलमध्येही जावे लागू शकतं.
चाईल्ड पाॅर्न
भारत सरकारचे चाइल्ड पॉर्नोग्राफीविरोधातील नियम अतिशय कठोर केले आहेत. गुगलवर चाइल्ड पॉर्न सर्च करणं किंवा पाहणं, शेअर करणं हा कायद्याने गुन्हा आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास जेलवारी करावी लागू शकते.
फिल्म पायरसी
चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच तो ऑनलाइन लीक करणे हाही एकप्रकारचा गुन्हा समजला जातो. या कायद्याचं उल्लंघन केल्यास 3 वर्षे जेल आणि 10 हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.
गर्भपात
गुगलवर गर्भपात करण्याच्या पद्धती सर्च करणं गुन्हा आहे. त्यामुळे ही गोष्ट गुगलवर चुकूनही सर्च करू नका. भारतीय कायद्यानुसार, डॉक्टरांचा सल्ला न घेता गर्भपात केला जाऊ शकत नाही..
बाब्बो.. आता ‘त्या’ देशांना WHO ने दिलाय गंभीर इशारा; पहा, कोणत्या कारणामुळे येणार ‘ही’ वेळ
कोरोना काळात ऑनलाइन लग्नाचा ट्रेंड.. कार्ड-भेटवस्तू आणि पाहुणेही राहिले डिजिटल