Diwali-Holi Celebration: अहमदनगर (ahmednagar): सध्या सणासुदीच्या काळात नगर शहरात तसेच उपनगरात कृत्रिम प्लास्टिक फुलांची (artificial plastic flowers) सर्रास विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या (farmers) उत्पादित फुलांना अपेक्षित भाव मिळत नाहीत. हीच समस्या लक्षात घेऊन यंदा हिंदुराष्ट्र सेनेच्यावतीने नगर शहरात तसेच उपनगरात कृत्रिम प्लास्टिक फुलाची होळी (Hindu Rashtra Sena organized artificial plastic flower Holi) करण्यात आली.
हिंदूराष्ट्र सेना नेते धनंजय भाई देसाई (Hindu Rashtra Sena leader Dhananjay Bhai Desai) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष संजय आडोळे (District President Sanjay Adole) यांच्या अध्यक्षतेखाली ही होळी करण्यात आली. हिंदूराष्ट्र सेनेने दीड महिन्यांपूर्वीच प्रशासनाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्यासहीत पर्यावरण मंत्र्यानाही निवेदनाव्दारे याबाबत सूचित केले होते. त्यात कृत्रिम प्लॅस्टीक फुलांवर बंदीची मागणी केली होती. निवेदनात म्हटले होते की, शेती (agriculture) हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे असून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. परंतु, या कृत्रिम आणि प्लास्टिक फुलाच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था ही कुठेतरी खिळखिळी करण्याचा परदेशी व देशद्रोही शक्तींचा प्रयत्न आहे. देशभरात प्लॅस्टिक बंदी असूनही या कृत्रिम फुलांद्वारे मोठ्या प्रमाणावर हे प्लॅस्टिक बाजारात व समाजात पसरत आहे. यामुळे शेतकरी व पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे सर्व पिकं पाण्याखाली गेली आहेत. त्यात हे कृत्रिम फुल बाजारात आल्याने शेतकऱ्याचे व देशाचे नुकसान होत आहे. (damage to the farmers and the environment)
- Business News : आयएमएफने का दिला परकीय चलन साठा वाचवण्याचा सल्ला : वाचा सविस्तर
- Good News for Student: विद्यार्थ्यांना मिळणार ‘त्याचे’ही शिक्षण; पहा काय निर्णय घेतलाय विद्यापीठाच्या कुलगुरू यांनी
- Agriculture News: अबब…दिवाळीत महागाईचा धक्का! ग्राहकांच्या खिशाला बसू शकते अधिकची झळ
शेतकरी हिताच्या या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी हिंदूराष्ट्र सेनेने या कृत्रिम फुलांची होळी केली. यानिमित्ताने हिंदूराष्ट्र सेनेने कृत्रिम आणि प्लास्टिकच्या फुलांचा वापर टाळावा यासाठी सुंदर संदेश रथ तयार केरून चौका चौका जनजागृतीही केली. आंदोलनात हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय आडोळे, पदाधिकारी निखिल धंगेकर, महेंद्र येनगुल, संदिपजी भुसे, रुद्रेश अंबाडे, अमोल बारस्कर ,ऋषीकेश चव्हाण, ऋषी नागरगोजे, भूषण तलेकर,निलेश शिंदे ,चिराग चव्हाण,तुषार सापते,राज सुर्यवंशी, ओंकार ओंकार हारदे,, राम भिंगारे, लोकेश साळुंखे, तुषार रामदासी, संतोष चेन्नुर, यश दुबे, साहिल पवार, ओंकार भागनगरे, शुभम कर्डिले,अजय ढवळे, अमोल बोल्ली, समर्थ गोसावी, आकाश वाबळे, केतन बडवे,आकाश शेळके, शेखर भैय्या दंडवते, प्रवीण बारस्कर, सचिन अडगटला,प्रशांत देठे, सागर अष्टेकर, प्रवीण आंधळे, शुभम भाळवणकर, देवेंद्र गोळे, पूजा बारस्कर, सिध्दी सोनार,किर्ती बेल्हेकर यांसह अनेकजण उपस्थित होते. यापुढे हिंदूराष्ट्र सेना सामान्य नागरिकांच्या विविध समस्या व हक्कांच्या लढ्यासाठी सदैव तत्पर राहील असे हिंदूराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय आडोळे यांनी यावेळी सांगितले.