Diwali Festival Car Discount: पुणे (pune): दिवाळीत आताच तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. कारण, देशातील कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी यांनी आपल्या वेगवेगळ्या कारवर बंपर डिस्काउंट ऑफर (bumper offer) दिला आहे. या ऑफर्सद्वारे तुम्ही कारच्या खरेदीवर हजारो रुपयांची बचत करू शकता. मारुती सुझुकी सेलेरियो, वॅगनआर, अल्टो K10, रेनॉल्ट क्विड आणि मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Celerio, WagonR, Alto K10, Renault Kwid & Maruti Suzuki Swift) या अशा कारवर सूट ऑफर उपलब्ध आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शोरूममध्ये या ऑफर चालू आहेत.
यात सेलेरियोच्या खरेदीवर तुम्हाला सर्वाधिक फायदा मिळेल. Celerio च्या नवीन जनरेशन मॉडेलवर कंपनी 59 हजार रुपयांपर्यंत सूट देत असून यामध्ये 40,000 रुपयांच्या रोख सवलतीचा समावेश आहे. यासोबतच 15 हजारांची एक्सचेंज डिस्काउंट (exchange discount) आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूटही (corporate discount) मिळणार आहे. लोकप्रिय हॅचबॅक स्विफ्टवरही मोठी सूट आहे. या कारवर 50,000 रुपयांपर्यंत सूट मिळत असून यामध्ये 30,000 रुपयांचा रोख लाभ, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे.
- Diwali holidays: अरेव्वा…’या’ देशातही मिळणार दिवाळी सुट्टी; येथील मुलांना मिळणार भारतीय संस्कृतीचे धडे
- Diwali Skin Glow Tips: दिवाळीला सेलेब्ससारखे चमकायचे आहे, “या “5 सोप्या टिप्स वापरून पहा
- Diwali Recipe 2022: सणासुदीत बनवा सर्वांना आवडेल अशी मखना खीर…
तर, मारुती सुझुकीची कार WagonR वर 40 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. यात कंपनी 20 हजार रुपयांचा रोख लाभ देत आहे. याशिवाय 15 हजारांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे. अशा परिस्थितीत ही कार खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर डील ठरू शकते. यासह, नवीन पिढीच्या Alto K10 वर 39 हजार रुपयांची सूट उपलब्ध आहे. यामध्ये 20,000 रुपयांचा रोख लाभ, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे. फ्रेंच कार कंपनी रेनॉल्ट (Renault Kwid) आपल्या कारवर भरघोस सूट देत असून कंपनी आपल्या एंट्री-लेव्हल कार Kwid वर 35,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. कंपनीच्या ऑफर अंतर्गत, 10,000 रुपयांची रोख सूट, 15,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. याशिवाय, 10,000 रुपयांचे कॉर्पोरेट फायदे निवडक प्रकारांवर उपलब्ध आहेत.